निराधार जावळीला ‘आधार’ मिळाला! भाजप किसान युवा मोर्चाच्या पाठपुराव्याने तालुक्यात पुन्हा सुरू आधार केंद्र



मेढा, ता. जावळी:
जावळी तालुक्यात आधार केंद्र नसल्यामुळे नागरिकांना आधार कार्ड काढण्यासाठी किंवा दुरुस्तीसाठी इतर तालुक्यांमध्ये जावे लागत होते. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर भाजप जावळी तालुका किसान युवा मोर्चाने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले असून तालुक्यात पुन्हा आधार केंद्र सुरू करण्यात आले आहेत.
भाजप जावळी तालुका किसान युवा मोर्चाचे अध्यक्ष राजू महाडिक यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी थेट जावळी तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदारांना निवेदन सादर केले होते. या निवेदनामध्ये जावळी तालुक्यात आधार केंद्र सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती.
या निवेदनाची दखल घेत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी प्रशासनाशी पाठपुरावा केला. त्यानंतर जावळी तालुक्यात करहर, मेढा आणि केळघर येथे आधार केंद्र पुन्हा सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे आता तालुक्यातील नागरिकांना आधार कार्ड काढण्यासाठी किंवा दुरुस्तीसाठी इतर तालुक्यांमध्ये जाण्याची गरज उरलेली नाही.
या निर्णयामुळे नागरिकांची होणारी पायपीट थांबली असून सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जावळी तालुका किसान युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळेच हे शक्य झाल्याची भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.
तालुक्यातील नागरिकांना आधार केंद्राची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल भाजप पदाधिकारी तसेच पक्ष नेतृत्वाचे आभारही नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहेत. समाजोपयोगी कामांमध्ये भाजप व किसान युवा मोर्चा नेहमीच पुढाकार घेत असल्याचेही नागरिकांनी नमूद केले.
यासह कुडाळचे माजी सरपंच वीरेंद्र शिंदे, चंद्रकांत नेवेकर, सतीश शिर्के, मंगेश पवार, राजू खुडे, संदीप निकम, विजय पवार आणि धनंजय मामुलकर यांनीही पाठपुरावा करताना सहकार्य केले

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

error: Content is protected !!