राजेंविना राजधानी पोरकी, तीन मंत्र्यांच्या मुंड्या खाली, बेरजेचं राजकारण: दीपक प्रभावळकर, सातारा यांच्या लेखणीतून

.

राजेंविना राजधानी पोरकी, तीन मंत्र्यांच्या मुंड्या खाली, बेरजेचं राजकारण

दीपक प्रभावळकर, सातारा

झालं ते अँस्टीन फाईल, अजितदादा जिवंत आहेत असलं सगळं झालं असेल तर बुडक्याच्या बातम्या बघू.

  • गेल्या पंचवीस वर्षांत जे घडलं नाही ते घडलं,
  • ऐतिहासिक मंत्रीपदं मिळाली असताना तिघांच्या मुंड्या खाली,
  • एक आमदार चक्रव्हिवात अडकला,
  • ज्याला जिल्ह्याच्या राजकारणात अडवले तोच तोर्रा मिरवणार,
  • चार अधिक अर्धा अशी साडेचार आमदार गणती असताना दोघांनी डारलं,
  • भाजपाच्या सत्तेत त्यांचीच ठसणारा निकाल

जिल्हा परिषद हे नाक मानलं जातं. गेल्या 25 वर्षांत साताऱ्यातील राजेंना लांब ठेवून zp ची सत्ता साताऱ्यात येतीय.
म्हणजे काय लग्गेच राजेंचं नाक कापलं गेलंय असं म्हणायचं नाहीये. पण जिल्हात 4 मंत्री असून पद मिळताच त्यांचा आकारण वाढलेला फुगा हेच या निकालाला कारण आहे. चार पैकी तिघांना टोला बसलाय. तिकडं शंभूराज आज जिल्ह्याचे पालकमंत्री or किंग मेकर झालेत की ज्यांना जिल्ह्याच्या राजकारणात येऊ दिलं जात नव्हतं.
राजकारण हे आज काय घडलंय, यावर तोललं जात नसतं त्याला पार्श्वभूमी असते. साताऱ्यात “जय – वीरू” च्या जोडीनं भाजपच्या गब्बरला कळूच दिलं नाही की त्यांना रामगड कधी फस्त केलं.
धन्नो पळालीय आता तुम्ही फक्त दगडावर बाटल्या फोडा, काय रे सांबा? असाच गब्बरचा प्रश्न असेल !

पार्श्वभूमी
जिल्ह्याला 4 मंत्री मिळाले, पण पद मिळताच यांचा नांगा ताठ. चौघात ताळमेळ ठेवायचा ना. बरं पालकमंत्री म्हणून शंभूराजला थोरली पाती द्यायला हे तिघे तयार होईना.
चौघे पण महायुतीचे मग एकत्र लढायचे ना? पण गावाबरोबर लढताना यांना यांची भावकी तुडवायची होती.

म्हणून
महाआघाडीचा विरोध नसताना यांनी आपापसात डोकी फोडून घेतली.

बरं,
एकदा पालकमंत्र्याच्या घरी बैठक झाली. त्यात मकरंद, रामराजे घरातून बाहेर पडतानाच्या बातम्या आल्या.

“मैं कुदा मैं लेटा, कुछ तो प्लॅन बनाया होगा ना”

अश्या अक्षय कुमारच्या ऍक्टिंग मध्ये शंभूराज होते पण लपडझप्पू कोणाला कळलं नाही.

राजेंविना राजधानीची सत्ता
Zpत गेल्या पंचवीस वर्षांत राजेंविना सत्ता नव्हती. सुनीलतात्या, चंद्रकांत जाधव असं कोणी तरी असणारच. पण यंदा दोन्ही राजेंना बाजूला नव्हे लांब ठेवून सत्ता स्थापन होत आहे.

चार पैकी तीन मंत्र्यांच्या मुंड्या खाली
थोडक्यात काय
तर
मकरंद यांना महाबळेश्वरसह खुद्द वाईमध्ये पण काही ठिकाणी पराभव अंगावर ओढून घ्यावा लागलाय.

साताऱ्याच्या शिवेंद्रसिंहराजे यांना फेसबुकने जिंकवण्याचा प्रयत्न केला पण जावलीमध्ये कुठं आली रेंज? इथं फक्त सातबाऱ्यावर शिक्का आहे. तुम्ही काय केल्या लोकांना गृहीत धरना. तेच तुमचे चमचे म्हणजे काय सगळा जावली प्रांत नव्हे, हे पण निकालात दिसलें.

जयाभाऊ सारखा तगडा मंत्री, ज्यानं, खासदार बदलला. पण याचा अर्थ असा नाही की त्यानं सगळं लक्ष सुटा बुटात ( सोलापुरात ) द्यावं आणि लंगोट ( कुकूडवाड ) विसरावं?
पैलवानानं आधी लंगोटवर लक्ष दिलं पाहिजे, तेच चुकलं.

खासदार तुमचा
पण
भाऊ – वहिनी लोकांची !
हे कसलं आलं राजकारण ??

महेश शिंदे जाऊन बुजून चूकले
जिल्ह्यात sena + ncp अशी आघाडी होत असताना सुद्धा जिल्ह्याचे राजकारण सोडून मतदारसंघात काय होईल हे ओळखून महेश शिंदे यांनी विश्लेषक यांची फिकीर न करता चुकीचं राजकारण केलं.
भले,
शंभूराज आणि महेश एकाच चिन्हावर निवडून आले असले तरी महेशने मतदारसंघ पाहून bjp सोबत घरोबा केला.
कारण,
घड्याळाचं शशिकांत भूत त्यांच्याच उरावर होतं ना, मग जिल्ह्याला फाट्यावर मारून जयाभाऊसोबत मतदारसंघ बघितला.

रामभाऊ सांगा कोणाचे? रामभाऊ हाच प्रश्न आहे, उगा पपा मम्मीचे असलं सांगू नका
गेल्या वीस वर्षांत सत्तेत असणाऱ्या रामराजे यांच्या कडे काय एपस्टीन फाईल होती की काय कोण जाणे, भले कायम सत्तेत……
आत्ता अजीतदादाच्या चिन्हावर आमदार,
सदिच्छा थोरल्यां साहेबांकडे,
मुलगा सेनेत,
लक्ष जिल्ह्याच्या सत्तेवर,
नेमणूक भावाची !

आपण,
बालवाडीतून पोस्ट ग्रॅज्युएट झालो तरी कळणार नाही, म्हणून “रामभाऊ कोणाचे” याचं उत्तर सोडून ते सत्तेत आहेत, हे लक्षात घेऊ.

मग मनोज – अतुलनीं काय करायचं?
जिल्ह्याचं राजकारण सुरु आहे मग
ज्या यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राचा मंगल कळश आणला त्यांच्या तालुक्यातील दोन आमदार
( दक्षिण ) अतुल भोसले आणि ( उत्तर ) मनोज घोरपडे
यांनी काय करायचे?
तर
त्यांनी भाजपा पक्ष वाढवीण्याकडे आपलं लक्ष केंद्रित करायचं.

शंभराज, दोस्ताला सत्ता देताय मग साडूला काय देताय?
Zp ची सत्ता आता शंभूराजआणि मकरंद – रामराजे ठरतील. यांत संख्या जास्त असल्याने मकरंद यांनाच प्राधान्य द्यावं लागेल.
पण
पालकमंत्री तुम्ही जिल्हा सांभाळताना नातेवाईक पण संभाळाले पाहिजेत.
तुमच्या साडूला असं उंडाळ्यात एकटं पाडून चालणार नाही.

या प्रदेशाध्यकांचे करायचं काय?
जावळीतून मुंबई – माथाडी, पुन्हा जावली
जावलीतून कोरेगावं
आणि
कोरेगावं मधून महाराष्ट्र
इतका प्रवास करणाऱ्या शशिकांत शिंदे यांनां यांत काय वाटा आहे का?
आता
हे झालं शंभूराजे यांचं दुखणं.
सत्तेत घ्यावं तर महेश नाराज
आणि
सत्तेबाहेर ठेवावे तर नामुष्की !
शिंदे साहेब, रानात शिकार झाली तर वाघीर सांभाळणाऱ्याला जितका वाटा येतो तितका तरी मिळतोय का बघा !

झालं हे सगळं, पुढं मुद्दा काय?
Zp च्या निमित्ताने वरवरचं खाऊन झालं.
सत्तेत साताऱ्याचे राजे नाहीत.
सत्ता शंभु-मकरंद -रामराजे हे सहयोगीसह करणार
हे कळलं
पण
अध्यक्ष, उपाध्यक्ष कोण?
तर
मकरंद कडे अध्यक्षपद
शंभूराजेकडे उपाध्यक्षपद

बाकी हम सब बाट लेंगे !
बसा बोंबलत ( पक्ष आदेश येईपर्यंत )

  • दीपक प्रभावळकर, सातारा
  • 9527403232

⛳⛳

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

error: Content is protected !!