
कुडाळ पंचायत समिती गणात निवडणूक घटकासमिप येऊन ठेपली असून, राजकीय रणांगण तापले आहे. कमळ आणि तुतारीच्या नावाखाली वर्षानुवर्ष सुरू असलेला सत्तेचा खेळ, खोटा दिखावा आणि स्वार्थी राजकारण आता जनतेसमोर उघड पडू लागला आहे. या बनावाला थेट आव्हान देत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)चे उमेदवार प्रशांत तरडे यांनी मशाल हाती घेत परिवर्तनाची ठिणगी पेटवली आहे.
कमळ उमलतं पदासाठी, तुतारी वाजते सत्तेसाठी,
मात्र जनता विचारते—काम कुठे, विकास कुठे?
असा सवाल उपस्थित करत प्रशांत तरडे यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला आहे. प्रत्येक निवडणुकीत तेच चेहरे, तीच नावं आणि तीच आश्वासनं पाहून जनता आता कंटाळली असून, “पद यांचंच, उमेदवारी यांचंच” या राजकारणाला यावेळी पूर्णविराम देण्याच्या तयारीत आहे.
वर्षानुवर्ष पदावर बसले, धनशक्तीच्या बळावर टिकले,
आता जनशक्ती जागी झाली, जुनी गणितं मोडली!
असा ठाम विश्वास व्यक्त करत तरडे म्हणाले की, मी कुठल्या घराण्याचा वारसदार नाही, तर सर्वसामान्य जनतेतून उभा राहिलेला शिवसैनिक आहे. विरोधकांना वाटते आमच्याकडे ताकद नाही; पण त्यांना माहीत नाही की शिवसैनिकांची निष्ठा हीच आमची खरी ताकद आहे.

कमळ आणि तुतारी—दोन्ही चिन्हांच्या आड लपलेली एकच गोष्ट म्हणजे धनशक्ती. सत्ता, पद आणि प्रभाव यांच्या जोरावर वर्षानुवर्षे निवडणुका लढवणाऱ्या या उमेदवारांची कारकीर्द कुडाळ पंचायत समिती गणातील ११ गावांतील जनतेने जवळून पाहिली आहे. निवडणूक कोणतीही असो, उभे तेच, विकास मात्र कधीच नवे दिसले नाहीत, हे जनता विसरलेली नाही.
कमळ-तुतारीचा आवाज जुना, मशालीचा आवाज नवा,
परिवर्तनाचा नारा पेटला, शिवसैनिक उभा राहावा!
असे सांगत प्रशांत तरडे यांनी स्पष्ट केले की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हातून मिळालेली मशाल ही केवळ चिन्ह नाही, तर अन्यायाविरुद्धचा प्रकाश आहे. ही मशाल कुडाळ पंचायत समिती गणात नवे राजकारण, नवी दिशा आणि नवा विश्वास घेऊन येणार आहे.
घटकासमिप निवडणुकीत आता चित्र स्पष्ट आहे—
कमळ आणि तुतारी विरुद्ध मशाल आणि सर्वसामान्य माणूस.
कुडाळ पंचायत समिती गणातील ११ गावांचा कौल यावेळी बदलाच्या बाजूने लागेल आणि मतदान उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मशालीलाच होईल, असा ठाम विश्वास एका सर्वसामान्य शिवसैनिकाच्या शब्दांतून उमटत आहे.
🔥 धनशक्तीचा खेळ संपवून, जनशक्तीचा विजय घडवण्याची वेळ आली आहे!



