कुडाळ जिल्हा परिषद गटात ‘शिट्टी’चा खणखणाट; धनशक्ती हादरली, विरोधकांच्या शिट्या गुल करण्यासाठी जनशक्ती रस्त्यावर! 🔥💥

कुडाळ जिल्हा परिषद गटात ‘शिट्टी’चा घणाघात; धनशक्तीविरोधात जनशक्तीचा रणसंग्राम – दीपक शेवते यांचा भाजपवर राष्ट्रवादी वर थेट हल्लाबोल
कुडाळ जिल्हा परिषद गटातील राजकारण सध्या निर्णायक वळणावर येऊन ठेपले असून, अपक्ष उमेदवार जयश्री संजय शेवते यांनी ‘शिट्टी’ या चिन्हावर उभे राहत भाजप व राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांच्या उमेदवारांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. ओबीसी आरक्षणावर या गटात लादलेल्या उमेदवाराविरोधात आणि ओबीसी समाजावर झालेल्या अन्यायाला सडेतोड उत्तर देण्यासाठी जयश्री शेवते यांनी सर्वसामान्य जनता, ओबीसी समाजासह सर्व घटकांना एकत्र करत गेल्या आठ ते दहा दिवसांत प्रचाराचा अक्षरशः रण उठवला आहे.


आज संपूर्ण जिल्हा परिषद गटात एकच चर्चा आहे—‘शिट्टी’चा बोलबाला! गावोगावी, वाड्या-वस्त्यांवर जयश्री शेवते यांच्या प्रचाराला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता राजकीय गणिते ढवळून निघाली आहेत. पारंपरिक पक्षांच्या प्रचारापेक्षा अपक्ष उमेदवाराच्या प्रचाराला मिळणारी गर्दी हीच बदलत्या राजकारणाची नांदी ठरत आहे.
या प्रचाराची सूत्रे युवा नेतृत्व व सामाजिक कार्यकर्ते दीपक शेवते यांनी आक्रमकपणे हाती घेतली असून, त्यांनी थेट भाजपच्या उमेदवारावर हल्लाबोल केला आहे. दीपक शेवते म्हणाले, “आम्ही शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे कट्टर मावळे आहोत. निवडून आलो तरी हा विजय शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या चरणी अर्पण करू. पराभूत झालो तरी आम्ही कायम त्यांचे मावळेच राहू. सेवा कधीच थांबणार नाही.”
ते पुढे म्हणाले, “ही निवडणूक केवळ जय-पराजयापुरती नाही. हा खऱ्या अर्थाने धनशक्तीविरोधात जनशक्तीचा लढा आहे. धनाच्या जोरावर तिकीट मिळवून, धनाच्या जोरावर निवडणूक लढवली जात आहे. मात्र आम्ही जनतेच्या आशीर्वादावर, त्यांच्या ताकदीवर आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनावर ही निवडणूक लढवत आहोत.”
गेल्या सात ते आठ दिवसांत अपक्ष उमेदवार जयश्री शेवते यांना मिळणारा वाढता पाठिंबा पाहता अनेक राजकीय तंबूंमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. काही ठिकाणी टांगा पलटी होण्याची, तर काही ठिकाणी घोडे फरार होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, निवडणुकीचे पारंपरिक समीकरण बदलण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.
विशेषतः युवक वर्गामध्ये दीपक शेवते यांनी निर्माण केलेली ऊर्जा आणि आक्रमक प्रचारशैलीमुळे नव्या पिढीचा ओघ ‘शिट्टी’कडे झुकत असल्याचे चित्र आहे. हीच युवा ताकद उद्याच्या निवडणुकीला कलाटणी देणारा निर्णायक घटक ठरू शकते, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.
कुडाळ जिल्हा परिषद गटात आता लढत स्पष्ट झाली आहे—धनशक्ती विरुद्ध जनशक्ती.
👉 मतदार ‘शिट्टी’ वाजवणार

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

error: Content is protected !!