कुडाळ गणात सौरभ शिंदेंचा अभूतपूर्व जलवा; प्रचार, रॅली आणि रोड शोमधून विरोधकांच्या काळजात धडकी(व्हिडीओ)

कुडाळ गणात सौरभ शिंदेंचा अभूतपूर्व जलवा; प्रचार, रॅली आणि रोड शोमधून विरोधकांच्या काळजात धडकी
कुडाळ पंचायत समिती गणाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार सौरभ शिंदे यांनी असा प्रचाराचा धडाका लावला आहे की, कुडाळ गणात असा जलवा यापूर्वी कधी पाहायला मिळाला नव्हता, अशी चर्चा सर्वत्र रंगली आहे. प्रत्यक्ष गाठीभेटी, घराघरात जाऊन केलेला संपर्क, जोरदार रोड शो, रोड रॅली आणि पदयात्रांमुळे सौरभ शिंदे यांनी संपूर्ण कुडाळ गण अक्षरशः ढवळून काढला आहे.


घराघरात जाऊन मतदारांशी थेट संवाद साधत, सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचे विकासाचे विचार आणि भाजपची भूमिका सौरभ शिंदे प्रभावीपणे मांडत आहेत. त्यांच्या या थेट संपर्क मोहिमेमुळे मतदारांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत असून, प्रत्येक भेटीत मिळणारा प्रतिसाद पाहता विजयाचा आत्मविश्वास कार्यकर्त्यांमध्ये अधिक बळावला आहे.
या प्रचार मोहिमेत सौरभ शिंदेंना सुहास दादागिरी, बाजार समितीचे सभापती जयदीप शिंदे, उपसभापती हेमंत शिंदे यांची ठाम साथ लाभत आहे. याशिवाय कुडाळ पंचक्रोशीसह कुडाळ पंचायत समिती गणातील सर्व तरुणाई एकवटून सौरभ शिंदे यांच्या विजयासाठी काम करताना दिसत आहे. “घराघरात भाजप, घराघरात विकास” हा संदेश घेऊन तरुण कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असून, त्यांच्या उत्साहामुळे प्रचाराला वेगळीच ऊर्जा मिळाली आहे.


सौरभ शिंदे यांचा प्रत्येक रोड शो म्हणजे जणू शक्तीप्रदर्शन ठरत आहे. ढोल-ताशांच्या गजरात, घोषणाबाजी करत काढण्यात आलेल्या रोड रॅलींना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. पदयात्रांदरम्यान महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत असून, “विकासासाठी सौरभ शिंदे” असा सूर सर्वत्र ऐकायला मिळत आहे.
विशेष म्हणजे, सौरभ शिंदे ज्या ज्या घरात जातात, त्या त्या ठिकाणी मतदारांकडून मिळणारा विश्वास आणि प्रेम पाहता विरोधकांच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाल्याचे चित्र आहे. प्रचारात घेतलेली आघाडी, संघटनाची ताकद आणि तरुणाईचा प्रचंड पाठिंबा यामुळे सौरभ शिंदे यांची मोहीम दिवसेंदिवस अधिक आक्रमक होत चालली आहे.


कुडाळ गणात सौरभ शिंदेंनी उभा केलेला हा प्रचाराचा रानावा केवळ प्रचारापुरता मर्यादित न राहता, निवडणुकीचा कल स्पष्ट करणारा ठरत असून, या जलव्यामुळे विरोधकांच्या काळजात धडकी भरल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

error: Content is protected !!