दिलेला शब्द पाळला!महाबळेश्वर नगरपालिकेत मकरंद पाटील यांचा शब्दखरा — नासिरभाई मुलानी उपनगराध्यक्ष

दिलेला शब्द पाळला!

महाबळेश्वर नगरपालिकेत मकरंद पाटील यांचा शब्दखरा — नासिरभाई मुलानी उपनगराध्यक्ष

स्वीकृत नगरसेवकपदी किसनशेठ शिंदे व मिलिंद ढेबे; सत्ताधाऱ्यांची ताकद पुन्हा अधोरेखित

महाबळेश्वर गिरीस्थान नगरपालिकेच्या राजकारणात आज सत्ताधारी गटाची ताकद ठळकपणे दिसून आली. महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी निवडणुकीत दिलेला शब्द अखेर पाळत, नासिरभाई मुलानी यांची उपनगराध्यक्षपदी सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीमुळे नगरपालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची पकड आणखी मजबूत झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या विशेष सर्वसाधारण सभेत नासिरभाई मुलानी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. सभागृहात टाळ्यांच्या गजरात झालेल्या या निर्णयाने विरोधकांवर सत्ताधाऱ्यांचा दबदबा पुन्हा एकदा अधोरेखित झाला. नियुक्तीनंतर नगराध्यक्ष सुनील शिंदे व नगरसेवकांनी पुष्पगुच्छ देत नासिरभाई मुलानी यांचा सत्कार केला.

याच सभेत स्वीकृत नगरसेवकपदी

राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या वतीने किसनशेठ शिंदे, तर गिरीस्थान नगर विकास आघाडीच्या वतीने मिलिंद ढेबे यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. या नियुक्त्यांमुळे सत्ताधारी आघाडीची संख्या व निर्णयक्षमतेत भर पडल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

दरम्यान, विरोधी गटनेते कुमार शिंदे यांनी शहराच्या विकासासाठी सहकार्याची भूमिका जाहीर करत, जनतेच्या प्रश्नांवर आक्रमकपणे आवाज उठवण्याचे संकेत दिले. तर सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने ॲड. संजय जंगम यांनी सर्वसमावेशक धोरण राबवत शहराच्या विकासाचा अजेंडा अधिक वेगाने पुढे नेण्याची ग्वाही दिली.

या विशेष सभेस मुख्याधिकारी योगेश पाटील, कर निरीक्षक अमित माने यांच्यासह नगराध्यक्ष सुनील शिंदे, उपनगराध्यक्ष नासिर मुलानी तसेच नगरसेवक अफझल सुतार, संतोष आखाडे, संतोष शिंदे, राहुल पिसाळ, रोहित ढेबे, राजू नालबंद, विमल पार्टे, पल्लवी कोंढाळकर, विद्या बावळेकर, रेश्मा ढेबे, स्मिता पाटील, प्रियंका वायदंडे, विमल बिरामणे, नीता झाडे, शबाना मानकर आदी उपस्थित होते.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

error: Content is protected !!