शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालयात फ्लोरिकल्चर अँड लँडस्केपिंग गार्डनिंग मॉड्युलचा दिमाखदार शुभारंभ

🌸( असीम मुजावर विशेष प्रतिनिधी) ….शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालयात फ्लोरिकल्चर अँड लँडस्केपिंग गार्डनिंग मॉड्युलचा दिमाखदार शुभारंभ 🌸

आधुनिक तंत्रज्ञानासह विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष व्यवसाय प्रशिक्षणाची सुवर्णसंधी

चिपळूण तालुक्यातील शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालय, दहिवली खरवते (संलग्न – डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली) येथे चालू असलेल्या शैक्षणिक वर्ष 2025–26 साठी सुरू करण्यात आलेल्या फ्लोरिकल्चर अँड लँडस्केपिंग गार्डनिंग मॉड्युलचा उद्घाटन समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

हे मॉड्युल अंतिम वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण असून, यामध्ये विद्यार्थ्यांना केवळ सैद्धांतिक ज्ञान न देता प्रत्यक्ष शेतावर काम करून व्यावसायिक कौशल्ये आत्मसात करण्याची संधी दिली जाते. या मॉड्युलअंतर्गत विविध विषयांशी संबंधित प्रशिक्षण दिले जात असून, विशेषतः फुलशेती व लँडस्केपिंग गार्डनिंग या क्षेत्रात आधुनिक पद्धतीने उत्पादन घेऊन जास्तीत जास्त नफा कसा मिळवता येईल, यावर भर देण्यात येत आहे.

या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश म्हणजे भविष्यात विद्यार्थी स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय सुरू करू शकतील, तसेच इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्याइतके सक्षम होतील.

या उद्घाटन समारंभाला चिपळूण–संगमेश्वरचे विद्यमान आमदार मा. शेखरजी निकम यांची प्रमुख उपस्थिती लाभली. विशेष म्हणजे, या महाविद्यालयाच्या सर्वांगीण विकासामागे आमदार शेखरजी निकम यांची दूरदृष्टी, सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि ठाम भूमिका निर्णायक ठरली आहे.
शैक्षणिक सुविधा, पायाभूत विकास, नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम आणि विद्यार्थ्यांसाठी प्रात्यक्षिक प्रशिक्षण यासाठी त्यांनी वेळोवेळी केलेल्या प्रयत्नांमुळेच आज शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालय महाराष्ट्रातील अग्रगण्य कृषी महाविद्यालयांमध्ये आपले स्थान निर्माण करत आहे.

यावेळी बोलताना आमदार शेखरजी निकम म्हणाले,
“ग्रामीण भागातील तरुणांना आधुनिक व रोजगारक्षम शिक्षण देणे हे माझे स्वप्न असून, शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालय हे त्या स्वप्नाची साकार रूप आहे.”
त्यांच्या या भूमिकेमुळे महाविद्यालयाचा शैक्षणिक दर्जा, विद्यार्थीसंख्या आणि विश्वासार्हता दिवसेंदिवस वाढत आहे.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनीत कुमार पाटील यांच्या सक्षम नेतृत्वाशिवाय ही प्रगती शक्य झाली नसती. डॉ. सुनीत कुमार पाटील यांनी पदभार स्वीकारल्यानंतर महाविद्यालयात शिस्त, गुणवत्ता आणि प्रात्यक्षिक शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य दिले. त्यांच्या अभ्यासपूर्ण नियोजनामुळे आणि विद्यार्थी-केंद्रित दृष्टिकोनामुळे महाविद्यालयाची शैक्षणिक ओळख अधिक मजबूत झाली असून, त्यांची प्रतिमा एक दूरदर्शी, कर्तव्यदक्ष आणि परिणामकारक प्राचार्य म्हणून उंचावत आहे.

या कार्यक्रमाला मॉड्यूल इन्चार्ज ए. आर. पाटील मॅडम यांचीही उपस्थिती होती. त्या स्वतः विद्यार्थ्यांना फुलशेती व लँडस्केपिंग गार्डनिंगचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देत असून, त्यांच्या मेहनतीमुळे हे मॉड्युल अधिक प्रभावी आणि परिणामकारक ठरत आहे.

या फ्लोरिकल्चर अँड लँडस्केपिंग गार्डनिंग मॉड्युलअंतर्गत
🌼 झेंडू
🌸 शेवंती
🌺 ऍस्टर
🌻 गिलार्डिया
अशा विविध व्यावसायिक फुलांची लागवड करण्यात आली आहे. पुढील तीन महिन्यांच्या कालावधीत भरघोस उत्पादन अपेक्षित असून, यामधून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष नफा-तोट्याचे गणित समजणार आहे.

या उपक्रमामुळे महाविद्यालयाची प्रतिमा अधिक भक्कम होणार, महाविद्यालयाच्या उत्तम दर्जाच्या शिक्षणाची दखल संपूर्ण महाराष्ट्र घेईल, तसेच या महाविद्यालयातून घडणारे विद्यार्थी कृषी क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवतील.

✨ आमदार मा. शेखरजी निकम यांच्या भक्कम नेतृत्वाखाली आणि प्राचार्य डॉ. सुनीत कुमार पाटील यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालय हे महाराष्ट्रातील कृषी शिक्षणाचे नवे केंद्र बनत आहे.
ही वाटचाल म्हणजे कॉलेज, विद्यार्थी आणि राज्याच्या कृषी भविष्यासाठी एक अभिमानास्पद पर्व असल्याचे मत सर्व स्तरातून व्यक्त होत आहे.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

error: Content is protected !!