महाबळेश्वर दि २७-११ महाबळेश्वर मधील जेष्ठ नागरिक शशी सुरेश गुप्ता याना महाबळेश्वर मध्ये घर विकत देण्याच्या मोबदल्यात पंधरा लाख रुपयांची फसवणूक प्रकरणी अक्षय अरुण वायदंडे रा महाबळेश्वर व रंजना मोहन कदम यांच्या विरुद्ध महाबळेश्वर पोलीस ठाण्यात तक्रारी अर्ज देण्यात आला असून फसवणुकीप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करावा अशी मागणी जेष्ठ नागरिक शशी सुरेश गुप्ता यांनी केली आहे त्यांचे पती चे देखील गेल्यावर्षी ह्रदयविकाराने निधन झाले या फसवणुकीबाबत सातारा पोलीस अधीक्षकांना देखील तक्रारी अर्ज दिला या अर्जात रंजना मोहन कदम यांचे महाबळेश्वर मधील घर विकत देतो म्हणून २०१९ साली विसार पावती करण्यात आली त्यानंतर पाच लाख एक हजार रुपये रोख गुप्ता यांच्याकडून अक्षय वायदंडे व रंजना मोहन कदम यांनी घेतले त्यानंतर दहा लाख रुपयांचा धनादेश घेतला व काही दिवसांनी तो देखील वटवीला असे एकूण पंधरा लाख रुपये घेतले मात्र ठरल्याप्रमाणे पाच महिन्यांच्या कालावधीत घराचा खरेदीचा व्यवहार झाला नाही त्यानंतर पैसेची वारंवार मागणी करून देखील टाळाटाळ केली गेली वारंवार पैश्याची मागणी केली त्याच तणावात शशी गुप्ता यांचे पती सुरेश गुप्ता यांचे हृदयविकाराने निधन झाले आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शशी गुप्ता यांनी पोलिसांना तक्रारी अर्ज दिला असून संबधीतांवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली असून सर्व पुरावे या तक्रारी अर्जासोबत जोडले आहेत वृद्धेच्या फसवणूक प्रकरणी चौकशी अंती पोलीस गुन्हा दाखल करतात का ? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे



