
कुडाळ–जावळीची भूमी ही धैर्य, परंपरा आणि संघर्ष यांची पवित्र जागा आहे. या भूमीने अनेक नेते दिले, पण जनतेच्या हृदयावर राज्य करणारे नेतृत्व क्वचितच जन्माला येते. आज या पवित्र भूमीने असा एक नेता घडवला आहे — सौरभ (बाबा) शिंदे. त्यांची वाटचाल जितकी संघर्षमय, तितकीच प्रेरणादायी; जितकी भावनिक, तितकीच जनतेशी घट्ट बांधलेली.

संघर्षातून घडलेले नेतृत्व
कुटुंबातील महान परंपरा, आजोबा कै.लालसिंगराव काका शिंदे यांचे प्रामाणिक राजकारण आणि वडील कै.राजेंद्र (भैय्या) शिंदे यांची समाजनिष्ठा—ही दोन्ही आधारस्तंभ एकाच वेळी हरवले. घराला दुःखाने खिंडार पडले. पण या अवघड परिस्थितीत मातोश्री सुनेत्राताई शिंदे यांच्या धैर्याने हा तरुण उभा राहिला आणि स्वतःला समाजकारणासाठी वाहून घेतले.

वडील आणि आजोबांनी जिथे कार्य केले, त्याच लोकांचा विश्वास टिकवणे—हे मोठे काम होते. परंतु सौरभ बाबांनी ते केवळ सिद्धच केले नाही, तर जनतेच्या हृदयात नवी जागा निर्माण केली.
जावळीचे आमदार, बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले – एक पाठीशी असलेला महत्त्वाचा आधार
सौरभ शिंदे यांच्या नेतृत्वाचा खरा उभारण्याचा काळ सुरू झाला तो जावळी साताऱ्याचे आमदार व राज्याचे बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनातून.
जेव्हा प्रतापगड सहकारी साखर कारखाना कठीण प्रसंगातून जात होता, कारखानदार, शेतकरी आणि कामगार यांच्या मनात अनिश्चिततेचे सावट होते, तेव्हा सौरभ बाबांची स्वप्ने धूसर होताना दिसत होती. अशा काळात एक हात पुढे आला… तो म्हणजे शिवेंद्रसिंहराजे यांचा.

त्यांनी केवळ आधार दिला नाही, तर कारखान्याला नवसंजीवनी देणारे निर्णय घेण्यास मदत केली. सहकाराचे जाळे टिकवण्यासाठी, कारखाना पुन्हा चालू ठेवण्यासाठी आणि लोकांचा विश्वास स्थिर करण्यासाठी शिवेंद्रसिंहराजेंनी सौरभ बाबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले.
याबद्दल “शिवेंद्रसिंहराजे नसते तर जावळीच्या सहकाराला शेवटचे घरघर लागली असती” हे सौरभ बाबा स्वतःच मनापासून सांगतात.
हे ऋण ते कधीही विसरणार नाहीत, असे ते आवर्जून सांगतात.

नेतृत्व म्हणजे पद नाही…
नेतृत्व म्हणजे लोकांच्या डोळ्यातून दिसणारा विश्वास.
आज सौरभ शिंदेंना हा विश्वास शंभरपट परत मिळतो.
युवकांच्या मनातील प्रेरणा, महिलांच्या मनातील सुरक्षिततेची भावना, शेतकऱ्यांच्या ओठांवरील समाधान—हे सर्व सौरभ बाबांबद्दल सांगतात.
त्यांच्या साधेपणात लोकांना आतल्या आत आपुलकी दिसते आणि त्यांच्या निर्णयक्षमतेत धडाडी दिसते.
माजी उपसभापती ते जनतेच्या हृदयाचा नेता
जावळी पंचायत समितीचे माजी उपसभापती म्हणून त्यांनी जे काम केले, ते आजही जनतेच्या स्मरणात आहे. रस्ते, पाणी, शिक्षण, आरोग्य—प्रत्येक मुद्द्यावर थेट लोकांमध्ये राहून काम करणारा हा नेता म्हणून त्यांची प्रतिमा अधिकच उंचावली.
आजचा दिवस – स्वप्नांच्या उंच भरारीचा प्रारंभबिंदू
आज सौरभ (बाबा) शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त, कुडाळ–जावळीच्या हजारो लोकांच्या मनात एकच भाव आहे —
“हा केवळ आमचा नेता नाही…
हा आमचा माणूस आहे.”

त्यांच्या नेतृत्वाला शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे पाठबळ, जनतेचे आशीर्वाद आणि युवकांची मजबुत फळी…
हे सर्व मिळून सौरभ बाबांचे नेतृत्व आता नव्या उंचीवर पोहोचत आहे.



