अट्टल घरफोड्या टोळीचा पर्दाफाश! बेकायदेशीर पिस्तूलसह थरकाप उडवणारे चोरटे जेरबंद बोरगाव डी.बी. पथकाची धडाकेबाज कारवाई – ५ घरफोड्या उघडकीस

सातारा जिल्ह्यातील बोरगाव पोलीस ठाणे हद्दीत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या घरफोडी प्रकरणांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. खुनाच्या गंभीर गुन्ह्याचा तपास सुरू असतानाच सलग घरफोड्यांची मालिका होत असल्याने पोलीस प्रशासनावर मोठे आव्हान निर्माण झाले होते. त्याच पार्श्वभूमीवर बोरगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी डी. एस. वाळवेकर यांनी डी.बी. पथकाला गुन्हे उघड करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या.

त्याचदरम्यान तांत्रिक माहितीच्या आधारे दि. १८ नोव्हेंबर २०२५ रोजी आरोपी नवनाथ प्रकाश गोळे (रा. कवठेकरवाडी, ता. पाटण) हा आपल्या दोन साथीदारांसह बेकायदेशीर देशी बनावटीचे पिस्तूल बाळगून आष्टे (पुर्नवसन) परिसरात येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी महादेव मंदिर परिसरात सापळा लावून धाडी टाकल्या. सुमारे १७.१० वा. करण्यात आलेल्या अचानक छाप्यात नवनाथ गोळे, ऋषिकेश सुर्यकांत सुळ आणि सुदर्शन अशोक मोहिते हे तिघेही जेरबंद करण्यात आले.

तिन्ही आरोपींच्या अंगझडतीत पोलिसांनी

  • देशी बनावटीचे पिस्तूल,
  • २ जिवंत काडतुसे,
  • नंबरप्लेट नसलेली करिझ्मा मोटारसायकल,
  • मोबाईल फोन,
  • रोख रक्कम,
  • कट्टर, कटावणीसारखी घरफोडीची साधने
    असा एकूण ₹५,०६,१०० किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. पिस्तूल बाळगण्याचा कोणताही कायदेशीर परवाना नसल्याचे आरोपींनी कबूल केले.

पोलिस कस्टडीत दरम्यान चौकशीदरम्यान आणखी एक साथीदार कृष्णा तुकाराम नरडे (रा. माजलगाव) याचेही नाव पुढे आले. पारंपरिक तपास पद्धती आणि इंटेरोगेशन स्किल्सचा वापर करत पोलिसांनी आरोपींना जुने गुन्हे कबूल करण्यास प्रवृत्त केले. आरोपींनी नागठाणे, पाडळी आणि अतित परिसरात एकत्रितपणे ५ घरफोड्या केल्याचे उघड केले.

पोलिसांनी या गुन्ह्यांतील

  • सोने-चांदीचे दागिने,
  • दोन मोटारसायकली,
  • वापरती साधने,
  • मोबाईल फोन,
  • रोख रक्कम
    असा एकूण ₹८,४६,१०० किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. आरोपींविरुद्ध भा.श.अ. १९५९ कलम ३, २५ तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ अन्वये अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक मा. तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक मा. वैशाली कडुकर, पोलीस उपअधीक्षक मा. राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
ही कारवाई सहा. पोलीस निरीक्षक धोंडीराम वाळवेकर, उपनिरीक्षक दिपक कारळे, सुधीर भोसले, प्रविण शिंदे, दिपक मांडवे, निलेश गायकवाड, प्रशांत चव्हाण, सतीश पवार, विशाल जाधव, समाधान जाधव, संजय जाधव यांनी संयुक्तपणे पार पाडली.

पोलीसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे बोरगाव परिसरातील घरफोड्यांच्या मालिकेला मोठा आळा बसला असून नागरिकांचा पोलिसांवरचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

error: Content is protected !!