जावलीत राजकीय भूकंप – शशिकांत शिंदेंचे कट्टर समर्थक बाजार समितीचे उपसभापती हेमंत शिंदे भाजपात! ना शिवेंद्रराजे काय म्हणाले(व्हिडीओ) 🔥

🔥 जावलीत राजकीय भूकंप – शशिकांत शिंदेंचे कट्टर समर्थक भाजपात! 🔥

आमदार शशिकांत शिंदे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे जावली कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती हेमंत शिंदे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाला थेट रामराम ठोकत आज ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचा फड्या गळ्यात घातला.

अजून काल-परवा पर्यंत प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या स्वागत समारंभात हेमंत शिंदे यांचे भाषण टाळ्यांच्या गजरात गाजले होते. पण अवघ्या पंधरा दिवसातच त्यांनी शिंदे गटाला धक्का देत त्यांचा हात कायमचा झटकला आणि भाजपाचा हात पकडला.

ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या उपस्थितीत झालेल्या या प्रवेशामुळे कुडाळ व जावली तालुक्याच्या राजकारणाला नवे वळण मिळणार असून, प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे यांच्या नेतृत्वाला मोठा बळकटीचा हात मिळाला आहे.

यावेळी हेमंत शिंदेसोबत कुडाळ ग्रामपंचायत सदस्य गौरव शिंदे, राष्ट्रवादी (शरद पवार गट) जावली तालुका उपाध्यक्ष धनंजय पोरे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपात दाखल होत जावलीतील राजकीय समीकरणे पूर्णपणे ढवळून काढली.

ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले :
“हेमंत शिंदे यांच्या प्रवेशामुळे जावलीत भाजपाची ताकद दुपटीने वाढणार आहे. पक्षात सामील झालेल्या सर्वांना मान-सन्मान मिळेल आणि सौरभ बाबा शिंदे यांच्या नेतृत्वाखालील युवा शक्तीला आम्ही पूर्ण पाठबळ देऊ.”

चेअरमन सौरभ शिंदे यांचा विश्वास :
“कुडाळच्या राजकारणातील सततची अस्थिरता आता संपुष्टात आली आहे. हेमंत शिंदे यांचा निर्णय गावाच्या सर्वांगीण विकासाला गती देईल. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ही साथ निर्णायक ठरेल.”

🎙️ हेमंत शिंदे .. स्थानिक राजकारणाच्या गरजा ओळखूनच हा निर्णय
“गावच्या हितासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. गेल्या पंचवार्षिकात कुडाळमध्ये विकास ठप्प झाला होता, आता भाजपाच्या माध्यमातून त्या कामांना गती देऊ. मी आजवर आ. शशिकांत शिंदे यांच्यासोबत निष्ठेने काम केले आहे, परंतु स्थानिक राजकारणाच्या गरजा ओळखून हा निर्णय घेतला. त्यांच्याशी कोणतेही वैयक्तिक मतभेद नाहीत.”

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

error: Content is protected !!