
गणेशोत्सव- दहीहंडी सुरळीत पार पाडण्यासाठी मेढा पोलिसांची ऐतिहासिक बैठक; एपीआय सुधीर पाटील यांच्या नेतृत्वाखाली व्यापक नियोजन
मेढा (ता. जावळी) –
मेढा पोलीस ठाण्याच्या पुढाकाराने आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली आज कलश मंगल कार्यालय, मेढा येथे आगामी गणेशोत्सव व दहीहंडी 2025 निमित्त सुरळीत, शांततापूर्ण आणि सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी भव्य बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे
बैठकीस जावळीचे तहसीलदार मा. हणमंत कोळेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी वाई मा. बालासाहेब भालचिंम यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे या बैठकीत पंचक्रोशीतील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध मंडळांचे अध्यक्ष, पोलीस पाटील, शांतता समितीचे सदस्य तसेच गणेश मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे
सुरक्षा आणि शिस्त यांची दुहेरी हमी
बैठकीत सणावारात अनुशासन, ध्वनीप्रदूषण नियंत्रण, वाहतूक व्यवस्थापन, आपत्कालीन सेवांची तत्परता यावर विशेष भर देण्यात येणार आहे जावळी तालुक्यात कर्कश्य डॉल्बी वाजणार नाही. एपीआय सुधीर पाटील यांनी सर्व प्रतिनिधींना सणाचा आनंद आणि सुरक्षितता एकत्र कशी राखता येईल यासाठी प्रभावी सूचना करणार आहेत
समन्वयातून सणोत्सवाचा आदर्श
मेढा पोलीस ठाण्याच्या या उपक्रमामुळे ग्रामपातळीपासून प्रशासनापर्यंत सर्व घटकांमध्ये उत्कृष्ट समन्वय निर्माण होणे होणे गरजेचे आहे यासाठी उपस्थित मान्यवरांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन देखील करण्यात आले आहे
बैठक या मुद्द्यावर लक्षवेधी होणार
मोठ्या प्रमाणात ग्रामपातळीवरील प्रतिनिधींचा सहभाग
शांतता व सुरक्षा यासाठी स्पष्ट मार्गदर्शक सूचना
सर्व गणेश मंडळांमध्ये सुसंवाद व एकजूट निर्माण
मेढा पोलिसांचा हा उपक्रम केवळ कायद्याच्या अंमलबजावणीपुरता मर्यादित नसून, सामाजिक सलोखा, लोकसहभाग आणि सणाचा आनंद या तिन्हींचे सुंदर मिश्रण सादर करणारा ठरत आहे.