कुडाळतील गावातील मुख्य रस्ता असलेला इंदिरानगर , लक्ष्मी रोड बाजारपेठ मार्गे छ.संभाजी महाराज चौक रस्त्याचे काम अखेर मार्गी :विरेंद्र शिंदे

कुडाळ:

महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून PWD (S.R.फंड) मधुन
सातारा जिल्हा दिशा समिती सदस्य मा. सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य विरेंद्र शिंदे यांच्या मागणीनुसार कुडाळ येथील पाचवड हून कुडाळ गावात येणारा इंदिरानगर , बाजारपेठ ते धर्मवीर छत्रपती संभाजीराजे चौक हा रस्ता मंजूर करण्यात आला होता.परंतु त्या कामास काही तांत्रिक अडीअडचणी मुळे विलंब लागत होता. या रस्त्यावर महाराज शिवाजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज असल्यामुळे शाळेत जाता येता विद्यार्थ्यांची पावसाळ्यामध्ये खूप गैरसोय होत होती मुलांच्या अंगावर चिखल व पाणी उडत होते आता या ठिकाणी दोन्ही बाजूस आरसीसी गटर व विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी फूटपाथ याची सोय होणार आहे तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र या रस्त्याला असल्यामुळे या रस्त्याला खूप रहदारी आहे या रस्त्याच्या बाजूलाच पशुवैद्यकीय दवाखाना असल्यामुळे हा रस्ता गावातील व भागातील नागरिकांन साठी महत्त्वाचा आहे ही गोष्ट सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या कानावर घातली आणि महाराज साहेबांनी लगेच अधिकारी यांना आदेश दील्याने तात्काळ ह्या कामाची सुरुवात करण्यात येणार आहे. या रस्त्या सह आरसीसी गटाचे काम चालू होत असल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले व माननीय नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचे विशेष आभार मानले
या रस्त्याचे काम सुरू करताना कुडाळ गावचे उपसरपंच सोमनाथ कदम, ग्रामपंचायत सदस्य राहुल ननावरे, युवा नेते आशिष रासकर, बांधकाम व्यवसायिक समीर भाई आत्ताDMK बँकेचे संचालक चंद्रकांत गवळी पिंपळवण अध्यक्ष महेश पवार समीर डांगे यशवंत कुंभार सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी साहेब इत्यादीस ग्रामस्थ उपस्थित होते

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

error: Content is protected !!