राजाभाऊ बोंद्रे यांच्या पत्रकारितेचा सन्मान — सातारा जिल्हा कार्याध्यक्षपदाची निवड आणि एक्सलंट जर्नालिस्ट अवॉर्डने गौरव”

फलटण : फलटण तालुक्यातील सातारा न्यूजचे कार्यकारी संपादक राजाभाऊ बोंद्रे यांची सातारा जिल्हा भारतीय पत्रकार संघाच्या कार्याध्यक्षपदी एकमताने आणि सार्थपणे निवड करण्यात आली आहे. पत्रकारितेतील त्यांच्या उल्लेखनीय, निडर आणि जनहितासाठी केलेल्या कार्याची दखल घेत भारतीय पत्रकार संघाच्या वतीने त्यांना एक्सलंट जर्नालिस्ट अवॉर्ड प्रदान करून गौरविण्यात आले. हा दुहेरी सन्मान त्यांची पत्रकारितेतील प्रतिमा आणखीन उंचावणारा ठरला आहे.

दिनांक 10 ऑगस्ट 2025 रोजी बारामती दूध उत्पादक संघाच्या हॉलमध्ये संपन्न झालेल्या भव्य सोहळ्यात राष्ट्रीय अध्यक्ष विक्रम सेन यांच्या हस्ते अवॉर्ड प्रदान करण्यात आला. या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष एम. एस. शेख, प्रदेश कार्याध्यक्ष सिकंदर नदाफ, राष्ट्रीय कार्याध्यक्ष रवींद्र नेरकर, प्रदेश संघटक अनिल सोनवणे, भारतीय पत्रकार संघाचे लीगल ॲडव्हायझर अँड. कैलास पठारे, पश्चिम महाराष्ट्र लीगल ॲडव्हायझर अँड. संदीप कांबळे, सातारा जिल्हा अध्यक्ष संदीप कुमार जाधव यांच्यासह सर्व पुणे जिल्हा कार्यकारिणी सदस्य व जिल्हाभरातील पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राजाभाऊ बोंद्रे यांनी आपल्या कारकिर्दीत सत्य, निर्भीडपणा आणि सामाजिक बांधिलकी जपत सातत्याने जनतेच्या प्रश्नांना आवाज दिला आहे. त्यांच्या कामगिरीला मिळालेला हा मान केवळ त्यांचा नाही, तर संपूर्ण सातारा जिल्हा पत्रकारितेच्या क्षेत्राचा सन्मान असल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली. या दुहेरी सन्मानामुळे राजाभाऊ बोंद्रे यांच्या पुढील वाटचालीला प्रेरणादायी ऊर्जा लाभेल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

error: Content is protected !!