
जावलीच्या ‘करोडपती सुपुत्रा’साठी नेत्यांचा कळवळा – रसमलाई की रसगुल्ले?
कुडाळ | प्रतिनिधी – वसीम शेख
जावली तालुक्यातल्या करोडपती सुपुत्रावर कारवाई होताच नेत्यांचा अचानक उसळलेला कळवळा पाहून सामान्य जनता अवाक झाली आहे. निषेध मोर्चा, भडक भाषणं, भव्य मेजवानी… एवढी चळवळ जणू एखादा क्रांतिकारक अन्यायग्रस्त आहे! पण जावलीचा जनसामान्य आता थेट विचारतोय –
“हा सगळा खटाटोप नेमका कोणासाठी आणि कोणाच्या खिशातून?”
सामान्य माणसावर अन्याय तेव्हा हे नेते कुठे होते?
जावलीत आजवर असंख्य सुपुत्रांवर अन्याय झाला.
भ्रष्टाचाराचे आरोप झाले.
माथाडी कामगारांपर्यंत डागाळले गेले.
कधी सिद्ध काहीच नाही,
कधी खरे अन्याय झाले,
पण कधीही असा मोर्चा नाही, अशी धुरा नाही!
मग यावेळी एवढा उत्साह का?
तालुक्यात चर्चेला एकच शब्द मिळाला आहे –
रसमलाई आणि रसगुल्ले!
कोणाला कोणती मिठाई पोहोचली, कोणाला कोणत्या लाभाची प्लेट मिळाली?
कोणाला पुढे करून कोणाचा भ्रष्टाचार झाकायचा आहे?
हा सगळा ‘मिठाई राजकारणाचा मेळावा’ असल्याचा टोलाही जनतेत सुरू आहे.
, मोर्चा, मेजवानी – राजकीय धुरळा उडवण्यासाठी?
याच दिवसांत जावली तालुक्याच्या सुपुत्राचा राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षपदी भव्य सत्कार होत आहे तालुक्याचा सन्मान म्हणून आणि अभिमान म्हणून पहिल्यांदाच जावळी तालुक्यातील सुपुत्र एवढ्या मोठ्या पक्षाचा प्रदेशाध्यक्ष झाला याचा अभिमान प्रत्येक तालुक्यातील जनतेला आहे असे असतानाच
त्याचवेळी 200-300 कोटींचा भ्रष्टाचार आणि बेहिशोबी मालमत्तेचे आरोप असलेल्या माथाडीच्या सुपुत्रासाठी अचानक मोर्चा काढला गेला.
जावळतली मेजवानी, व मोर्च्यात हजारो लोक, भरगच्च तंबू-जेवणाची रेलचेल…
नेमकं हे कोणाच्या खिशातून?
आणि कोणाची प्रतिमा वाचवण्यासाठी? पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी आमदारासह विरोधी पक्षातल्या आमदारांनी देखील 200 ते 300 कोटींची बेहिशोबी मालमत्ता गोळा केली असा आरोप केल आता हा आरोप किती सत्य किती खोटा हे अद्यापही कधी समोर येणार नाही नाही आणि जरी आली तरी त्यावर कारवाई होणार का असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे
जनतेला सरळ संदेश मिळतोय –
“तालुक्याच्या खऱ्या समस्या महत्त्वाच्या नाहीत,
करोडपती सुपुत्र महत्वाचे लक्ष्मीपुत्र महत्त्वाचे!” ज्यांच्यावर 200 ते 300 कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता गोळा करण्याचे आरोप झाला त्यांनी नेमकं जावळी तालुक्यातल्या किती लोकांचं भलं केलं .यांची एकदा नाव जाहीर करावीत .किती सामाजिक काम केली .हे देखील स्पष्ट करावे. मगच हे जर सिद्ध झालं तर संपूर्ण तालुका या सुपुत्राच्या पाठीमागे ठामपणे उभा राहील .मात्र एका सुपुत्राचा सन्मान होत असतानाच हा सन्मान झाकण्यासाठी अर्थातच सूर्याला झाकण्यासाठी कोंबड्याचा खुराडा वापरला जातोय
हे हास्यास्पद आहे. अशी तालुक्याचे जनता बोलू लागली आहे .त्यामुळे चार ऑगस्ट जावळी तालुक्यातील क्रांती दिन म्हणून ओळखला जाऊ नये म्हणजे नवलचं
जावलीच्या खऱ्या समस्या अजूनही प्रलंबित…
महू धरणाचा प्रश्न अजून तसाच
सिंचनाची भीषण टंचाई
रस्त्यांची दयनीय अवस्था
तरुणांसाठी रोजगाराचा तुटवडा
निवडणुकीत दिलेली आश्वासनं अद्याप कागदावरच
असाच मोर्चा जर ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी निघाला असता तर नक्कीच तालुक्यातल्या जनतेने हातावर नाहीतर डोक्यावर उचलून घेतले असते मात्र ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी याच नेत्यांना वेळ नाही मात्र याच लक्ष्मी पुत्राला देण्यासाठी नेते मात्र एकवटले आहेत हे या तालुक्याचं दुर्भाग्य म्हणून समजलं जाऊ लागला आहे
या प्रश्नांसाठी कधी मोर्चा निघाला नाही!
पण करोडपती सुपुत्रावर कारवाई होताच जावली हादरली आणि मोर्चाला निघाली.
जनतेचा सरळ सवाल
“नेत्यांनो, सामान्य माणसावर अन्याय झाला तेव्हा तुम्ही कुठे होता
हा सगळा खटाटोप नेमका कोणाचं संरक्षण करण्यासाठी?
रसमलाई-रसगुल्ल्याच्या राजकारणातून जावलीला नेमकं काय मिळणार?”
तालुक्यात आता एकच चर्चा –
जावलीच्या राजकारणात रसमलाईचा सुगंध आणि रसगुल्ल्याची गोडी भरली आहे,
पण सामान्य माणसासाठी अजूनही ताट रिकामंच आहे!