काळ आला पण वेळ नाही! कुडाळ जावळीतील शाळेत कोसळले धोकादायक झाड – सुदैवाने टळली मोठी दुर्घटना

कुडाळ, जावळी (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा)

कुडाळ तालुक्यातील जावळी येथे असणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सोमवारी मुसळधार पावसात एक भला मोठा वृक्ष अचानक कोसळला. त्यावेळी शाळा सुरू होती आणि विद्यार्थी वर्गांमध्ये उपस्थित होते. सुदैवाने झाड शाळेच्या मैदानावर कोसळले आणि कोणीही जखमी झाले नाही. मात्र काही सेकंदांचा फरक असता, तर मोठी दुर्घटना घडली असती!

सामाजिक कार्यकर्ते अशिष रासकर यांनी या धोकादायक झाडाबाबत वन विभागाकडे वेळोवेळी परवानगीसाठी पाठपुरावा केला होता. त्यांनी आधीच इशारा दिला होता की हे झाड कधीही कोसळू शकते. मात्र, वनविभागाने झाड तोडण्यास परवानगी दिली नाही. आणि अखेर निसर्गाच्या रौद्र रूपानेच हे झाड कोसळले.

🌳 “धोकादायक झाडं तोडायला परवानगी नाही, मग कशाला द्यायची?” असा सवाल रासकर यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी वनविभागाच्या दिरंगाईवर संताप व्यक्त केला असून, आता तरी शाळा परिसरातील अन्य धोकादायक झाडांची तातडीने पाहणी करून ती काढून टाकावी, अशी जोरदार मागणी केली आहे.

🛑 ही घटना वेळेत उपाययोजना न केल्याचे थेट उदाहरण आहे. प्रशासन याकडे गांभीर्याने पाहणार का? – असा सवाल पालकवर्ग, ग्रामस्थ आणि शिक्षकांनी उपस्थित केला आहे.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

राजकीय आखाडा

दहा कोटींचा नफा देणाऱ्या चेअरमनवरच अविश्वास? – वसंतराव मानकुमरे यांचा थेट इशारा!” 🛑जावळी बँकेतून ‘भोसले-गवळी’ संचालकांवर सडकून टीका; सहकार परिषदेतून ‘सरळ करण्याचा’ घणाघात!(व्हिडीओ)

error: Content is protected !!