साताऱ्यात मानव–बिबट संघर्षावर जनजागृतीचा जागर; उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभावी उपक्रम


सातारा | प्रतिनिधी (इम्तियाज मुजावर)
जिल्ह्यातील बिबट वावर क्षेत्रात वाढत्या वावराच्या पार्श्वभूमीवर मानव–बिबट संघर्ष टाळण्यासाठी सातारा वनविभागाने पुढाकार घेतला असून, नुकतेच दि. 27 जुलै 2025 रोजी नियतक्षेत्र भरतगाव अंतर्गत मौजे काशीळ (माने वस्ती) येथे विशेष जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

या उपक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे नवीन नियुक्त झालेले सातारा जिल्ह्याचे उपवनसंरक्षक मा. अमोल सातपुते यांच्या सूचनांवर व मार्गदर्शनाखाली संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन झाले. त्यांच्या नेतृत्वात वनविभागाने ‘संवेदनशील संवाद आणि समर्पक माहिती’ या सूत्रावर भर देत ग्रामस्थांपर्यंत थेट पोहचण्याचा प्रयत्न केला.

कार्यक्रमात उपस्थित सहाय्यक वनसंरक्षक मा. प्रदीप रौदळ, वन्यजीव पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. निखिल बांगर, वनरक्षक श्री. अभिजित कुंभार (भरतगाव)श्री. मुकेश राऊळकर (सातारा) यांनी बिबट्याची जीवनशैली, अन्नसाखळीत त्याचे स्थान, संघर्षाची कारणं व त्यावरील उपाय, तसेच जंगल किनारी वस्ती असलेल्या गावांतील नागरिकांनी घ्यावयाच्या खबरदाऱ्या याबाबत सखोल माहिती दिली. ग्रामस्थांच्या शंका, प्रश्न यांचे सविस्तर निरसन करण्यात आले.


🔔 जाहीर आवाहन – बिबट्याचा वावर टाळण्यासाठी वनविभागाच्या सूचना:

  1. शेतात जाताना एकटे न जाता सोबत एखादी व्यक्ती घेऊन जावे.
  2. हातात काटी असावी आणि त्याला घुंगरू बांधावेत.
  3. मोबाईलवर हलक्या आवाजात संगीत चालू ठेवावे.
  4. अधूनमधून आवाज करत, हरळी घालत चालावे.
  5. वाकून/बसून काम करताना आजूबाजूचा सतत आढावा घ्यावा.

लहान मुले हे बिबट्याचे थेट भक्ष्य नसले तरी त्यांच्या हालचाली बिबट्याला भ्रमित करू शकतात, म्हणून विशेष काळजी घेणे अत्यावश्यक आहे. बिबट्याला माणसांपासून भीती वाटते, त्यामुळे तो थेट हल्ला करत नाही. मात्र, अचानक समोर आल्यास धोका संभवतो.


📞 बिबट्याचा वावर दिसल्यास किंवा बिबट अडकलेला असल्यास तात्काळ संपर्क साधावा:

7972955337 / 8806798767 / 7588380495 / 8888277001


🌿 वनविभागाची बदलती प्रतिमा – नेतृत्वात नवे पर्व
मा. अमोल सातपुते सरांच्या नेतृत्वाखाली सातारा वनविभाग अधिक सक्रिय, संवादात्मक आणि लोकाभिमुख झाल्याचे स्पष्ट जाणवत आहे. संवेदनशील विषयांवर थेट गावकऱ्यांमध्ये जाऊन जनजागृती करणे ही एक प्रगल्भ भूमिका ठरते आहे. भविष्यातही अशाच उपक्रमांच्या माध्यमातून वन्यजीव संरक्षण आणि लोकसहभागाची सांगड अधिक बळकट होणार, असा विश्वास स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केला.


🟢 ‘वनविभाग जनतेच्या जवळ!’ – ही भावना प्रत्यक्ष कृतीतून अनुभवास येत आहे.


aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

error: Content is protected !!