गौरीशंकर एम फार्मसी विद्यार्थ्यांचा भविष्यकाळ उज्वल.. श्रीरंग काटेकर. लिंब येथील महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव. गौरी काशीद बेस्ट आउटगोइंग स्टुडन्ट सन्मानित

. लिंब… (प्रतिनिधी) मानवी जीवनाच्या आरोग्याशी निगडित असणारे औषध निर्माण शास्त्र हे काळानुसार प्रगत व प्रगल्भ झाले असून या शाखेतील नाविन्यपूर्ण शिक्षण प्रणालीचा स्वीकार गौरीशंकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मासिटिकल एज्युकेशन अँड रिसर्च लिंब महाविद्यालयाने केला असून विद्यार्थ्यांना ज्ञानदानातून सक्षमपणे घडविले जात असल्याने त्यांचा भविष्यकाळ हा उज्वल राहणार असल्याचे मत गौरीशंकर चे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर यांनी व्यक्त केले. ते गौरीशंकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मासिटिकल एज्युकेशन अँड रिसर्च लिंब महाविद्यालयात एम फार्मसी शाखेतील गुणवंत विद्यार्थी व अंतिम वर्ष एम फार्मसी सन 2024 -25 मधील विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभ निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संतोष बेल्हेकर, डॉ धैर्यशील घाडगे, प्रा रोहन खुटाळे, प्रा.किर्ती माने,प्रबंधक निलेश पाटील आदी प्रमुख उपस्थित होते. श्रीरंग काटेकर पुढे म्हणाले की औषध निर्माण क्षेत्रात काळानुसार मोठ्या प्रमाणात बदल घडत आहेत विविध दुर्धर आजारावर परिणामकारक औषध निर्मिती बाबत संशोधन केले जात आहे या संशोधनाला यशही प्राप्त होत आहे विद्यार्थ्यांनी याकडे डोळसपणे पाहणे गरजेचे आहे. प्राचार्य संतोष बेल्हेकर म्हणाले की एम फार्मसी हा औषध निर्माण क्षेत्रातील उच्च ज्ञानावर आधारित अभ्यासक्रम आहे विद्यार्थ्यांनी यातील सखोल ज्ञान प्राप्त करून आपले करिअर उज्वल घडवावे या विद्यार्थ्यांकडून नाविन्यपूर्ण संशोधनाची अपेक्षा असून यासाठी विद्यार्थ्यांनी कार्य करावे. यावेळी एम फार्मसी शाखेतील विद्यार्थिनी गीतांजली संजय होले हिने संशोधन क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल तिला प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले तसेच महाविद्यालय स्तरावर दरवर्षी देण्यात येणारा बेस्ट आउटगोइंग स्टुडन्ट पुरस्कार गौरी अनिल काशीद हिला प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील जुन्या आठवणींना उजाळा दिला प्रास्ताविक व आभार कु कोमल इतके हिने केले. फोटो… निरोप समारंभात गुणवंत विद्यार्थिनी गौरी काशीद हिचा सत्कार करताना श्रीरंग काटेकर समवेत डॉ संतोष बेल्हेकर, डॉ धैर्यशील घाडगे, प्रा कीर्ती माने निलेश पाटील.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

error: Content is protected !!