सोळशीच्या पात्रात एक जीव गेला… पण मेढा, API राठोडांच्या तपासाने न्यायालयात खून सिद्ध झाला!”

🔴 क्राईम स्पेशल( इम्तियाज मुजावर)| “सोळशी पात्रात खून… तपासाच्या तडाख्यात गुन्हेगार! माजी पोलीस निरीक्षक निळकंठ राठोड यांच्या शिताफीने गुन्हा उजेडात; जन्मठेपेची शिक्षा ठोठावली”


🗓️ घटना : २९ एप्रिल २०१९ | ठिकाण : तापोळा हद्द – सोळशी नदीपात्र, वाई तालुका, सातारा जिल्हा


हातात माती, डोक्यात आग… आणि नदीत प्राणांचा थरार!

२०१९ च्या उन्हाळ्यात, तापोळा गावाच्या हद्दीत असलेल्या सोळशी नदीपात्रात एक घटना घडली, जी पुढे जाऊन संपूर्ण सातारा जिल्ह्याच्या पोलिस तपास इतिहासात ठळक ठरणारी ठरली.

सुनिल लिंबाजी माने, किसन जाधव आणि मयत रंगनाथ विलास पवार—हे तिघे मजुरीवर काम करणारे. वाटणीच्या पैशावरून तीन वाजण्याच्या सुमारास तोंडावरून हातावर गेले… भांडण चिघळलं… आणि एका झटक्यात रंगनाथ याला मारहाण करत नदीपात्रात ढकलण्यात आलं.

मृत्यू जागीच झाला.


खबरीची माहिती आणि तपासाची धग

साधारण काही तासांत “वैगेरे” खबरीमार्फत मेढा पोलीस स्टेशनला माहिती मिळाली. तत्काळ गुन्हा रजि. क्र. ७९/२०१९ नोंदवण्यात आला.

तेव्हाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निळकंठ राठोड यांनी स्वतः तपासाची जबाबदारी घेतली. घटनास्थळाची पाहणी, मृतदेहविच्छेदन, प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांची ओळख, आणि आरोपीचा तपास हे अत्यंत काटेकोरपणे व वेळेत पार पाडले गेले.

API राठोड यांच्या धोरणात्मक आणि हुशारीने पार पडलेल्या सीताफिने तपासामुळे अवघ्या काही दिवसांत मुख्य आरोपीस अटक झाली.


न्यायालयीन झुंज : ९ साक्षीदार, मजबूत पुरावे

सदर खटल्याची सुनावणी अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश मा. श्री. आर.एन. मेहेरे यांच्या न्यायालयात झाली.

सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता श्री. आशीर्वाद आर. कुलकर्णी यांनी सखोल युक्तिवाद सादर केला. एकूण ९ साक्षीदार तपासले गेले.

प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने केलेला वर्णन, तपासातून उघड झालेली पुराव्यांची साखळी, आणि पोलिसांनी गोळा केलेली प्रत्येक माहिती न्यायालयात ठोस ठरली.


निकाल : आरोपीस जन्मठेप आणि दंडाची शिक्षा

२६ जून २०२५ रोजी न्यायालयाने ठोस निर्णय देत
▪️ भादंवि कलम ३०२ अन्वये जन्मठेप व ₹५०० दंड
▪️ कलम ५०६ अन्वये दोन वर्षे सक्त मजुरी
अशी शिक्षा सुनिल लिंबाजी माने यास ठोठावली.


पोलीस यंत्रणेच्या संघटित प्रयत्नांची फळं

या यशस्वी कारवाईसाठी पोलीस निरीक्षक श्री. सांडभोर (महाबळेश्वर पो.स्टे.), उपविभागीय अधिकारी बाळासाहेब भालचीम, तसेच तपास अधिकारी एन.एम. राठोड यांचा मोलाचा वाटा होता.

पैरवी अधिकारी पो. कॉ. किर्तीकुमार कदम, महिला पो.हवा. व्ही.व्ही. जाधव, पो.कॉ. सपकाळ, हवा. भुजंगराव काळे, म.पो.कॉ. शिंदे, प्राची घोरपडे व इतरांनी महत्त्वपूर्ण मदत केली.


माजी पोलीस निरीक्षक राठोड यांचा ठसा कायम!

या प्रकरणात मुख्य तपास अधिकारी असलेले निळकंठ राठोड यांनी घटनास्थळी पोहोचून तात्काळ हालचाली सुरू केल्या. यामध्ये विचारपूर्वक परिस्थितीचे मूल्यांकन, साक्षीदारांची हेरगिरी, आरोपीचे हालचाली टिपणं, हे सर्व त्यांनी अचूकतेने केलं.

आज ते निवृत्त उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून सेवामुक्त आहेत, पण “सोळशी खून प्रकरण” त्यांच्या यशस्वी तपासांची एक वेगळी ओळख बनली आहे.


▪️ २०१९ ची घटना – २०२५ मध्ये न्याय मिळवणारी यंत्रणा
▪️ तपास, पुरावे, पैरवी आणि न्यायालयीन युक्तिवाद यांची चौकट ठाम
▪️ “गुन्हा घडतो तेव्हा काही कळत नाही… पण पोलिसी दक्षतेनं तो विसरला जात नाही!”


aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

error: Content is protected !!