
Aim मीडिया च्या बातमीला प्रतिसाद : खड्डामुक्तीची धडाकेबाज मोहीम!
जावळी तालुका | कुडाळ-पाचगणी रस्ता
Aim मीडिया ने केलेल्या खड्ड्यांच्या वृत्तांकनाची तातडीने दखल घेत जावळी तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाने कुडाळ-पाचगणी रस्त्यावर खड्डामुक्तीची मोहीम धडाक्यात सुरू केली आहे.
आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर करहर नगरीत हजारो भाविकांची वर्दळ असते. या पवित्र दिवशी कोठल्याही वारकऱ्यांना त्रास होऊ नये यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग सज्ज झाले आहे. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघाताच्या घटना उघड झाल्यानंतर विभागाने ही मोहीम युद्धपातळीवर राबवली आहे.
अभियंता अटकेकर यांचे मार्गदर्शन:
खड्ड्यांची माहिती मिळताच अभियंता श्री. अटकेकर स्वतः घटनास्थळी उपस्थित राहिले. त्यांनी खड्डे बुजवण्याचे काम पाहणीअंती सुरू करून, थेट “खड्डामुक्त कुडाळ-पाचगणी रस्ता” ही मोहीम राबवण्याचे आदेश दिले. पावसामुळे अडथळे येत असले तरी उघड्या वातावरणाचा लाभ घेत कामे वेगात सुरू आहेत.

वारकऱ्यांच्या सेवेसाठी सामाजिक बांधिलकी:
वारकऱ्यांच्या सोयीसाठी केलेला हा उपाय योजनाबद्ध असून, भाविकांची सुरक्षितता हे सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्राधान्य आहे. यामुळे वाहनचालक व स्थानिक नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे आभार मानले आहेत.
“रस्त्यावरील कोणताही खड्डा लांबू दिला जाणार नाही, तो तातडीने बुजवण्यात येईल,” असे स्पष्ट आश्वासन अभियंता अटकेकर यांनी दिले आहे.

Aim मीडियाच्या बातमीमुळे प्रशासन खडबडून जागे झाले असून, यामुळे समाजहिताच्या दृष्टीने सकारात्मक बदल घडतो आहे, हेच आमच्या पत्रकारितेचे यश!
.