चांदोबाचा लिंब : माऊलीच्या पालखी सोहळ्यात ‘मोदींचं दर्शन’?

🟨 चांदोबाचा लिंब : माऊलीच्या पालखी सोहळ्यात ‘मोदींचं दर्शन’?

चांदोबाचा लिंब, सातारा —
माऊलींच्या पालखी सोहळ्याच्या आजच्या दुसऱ्या रिंगणात एक अनोखा क्षण पाहायला मिळाला!

सगळ्या उपस्थित वारकऱ्यांचे आणि भाविकांचे लक्ष वेधून घेतलं, ते म्हणजे हुबेहूब पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखे दिसणाऱ्या विकासजी मोहनते व्यक्तीचं अचानक आगमन!

पालखी सोहळ्यात सहभागी झाल्यानंतर अनेकांना वाटलं की खुद्द मोदीच पालखी सोहळ्यात आलेत!
या प्रतिकृतीबरोबर फोटो, सेल्फी घेण्यासाठी वारकरी आणि भगिनींनी एकच गर्दी केली.

विशेष म्हणजे, भाजपचे युवा नेतृत्व सुशांत निंबाळकर यांच्या सोबत उभं राहून या ‘मोदी प्रतिकृती’ विकासजी मोहनते यांनी सर्वांना अभिवादन केलं.
मोदींसारखी वेशभूषा, हावभाव आणि चालणी — एवढी हुबेहूब समरूपता की पाहणाऱ्यांना क्षणभर वाटून गेलं… ‘पंतप्रधान माऊलींच्या पालखीत सहभागी झाले काय?’

प्रत्यक्ष मोदींबरोबर फोटो घेता आला नाही तरी काय झालं, त्यांच्यासारख्या हुबेहूब प्रतिकृती विकास मोहनते यांच्या सोबत फोटो घेण्याचा आनंद मात्र गगनात मावणारा होता!

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

error: Content is protected !!