वाढदिवस विशेष लेख : माणसं जोडणारा राजा – पुंडलिक पाटील महामूलकर : “वडिलांच्या पावलावरून मैत्रीच्या राजकारणात चालणारा माणूस”

🌟 इम्तियाज मुजावर यांच्या लेखणीतून

सातारा जिल्ह्याच्या राजकीय, सामाजिक आणि माणुसकीच्या प्रवाहात एक नाव अत्यंत आपुलकीने घेतलं जातं – पुंडलिक पाटील महामूलकर!
वडिल कै. विठ्ठल पाटील महामूलकर यांचं गारुड आणि कार्य एवढं मोठं की, जावळी तालुक्यातील कोणताही नेता ग्रामपंचायत असो, जिल्हा परिषद असो, की विधानसभेपासून संसदेपर्यंत कोणत्याही निवडणुकीपूर्वी त्यांच्या घरी हजेरी लावल्याशिवाय पुढचं राजकारण सुरु करत नसे.

त्याच वडिलांच्या मार्गदर्शनात व मैत्रीच्या संस्कारात घडलेलं व्यक्तिमत्त्व म्हणजे पुंडलिक पाटील, जे वडिलांचं छत्र अचानक हरवून देखील खचले नाहीत, तर उभं राहिलं. शेती, व्यवसाय, समाज, नातेसंबंध, गावगाडा आणि राजकारण अशा प्रत्येक क्षेत्रात त्यांनी स्वतःचं एक खास स्थान निर्माण केलं आहे. सातारा जिल्ह्याच्या प्रत्येक कोपऱ्यात आजही “पुंडलिक पाटील हे आपलेच” अशी भावना दिसते.

महाबळेश्वरच्या वीज वितरण मंडळाचे गेस्ट हाऊस त्यांनी चालवायला घेतलं आणि ते ठिकाण आज केवळ ऑफिस नाही तर मैत्री, आदर, पाहुणचार आणि चविष्ट जेवणाचा पंढरपूर बनलं आहे.
“जेवल्याशिवाय जाऊ नका!” – हा पुंडलिक पाटलांचा आग्रह, त्यांच्या मृदु भाषेइतकाच प्रसिद्ध आहे.

त्यांच्या हातचं जेवण – विशेषतः मटन-भाकरी – ही केवळ जेवणाची गोष्ट नसून, मैत्रीच्या ताटात वाढलेली आपुलकीची अनुभूती आहे.
या अशा अनोख्या व्यक्तिमत्त्वाला, आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त सातारा जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते, नागरिक आणि मित्रपरिवार त्यांच्या माणूसकीच्या स्वभावाला संबंध अधिक घट्ट करून जातो

पुंडलिक पाटील हे केवळ विठ्ठल पाटलांचे सुपुत्र नाहीत, तर त्यांच्या कार्याची न संपणारी उजळ पुनरावृत्ती आहेत.
आजही अनेक मोठे नेते, मंत्र, आमदार, खासदार भिवडीला गेले की – आधी कैलासवासी विठ्ठल पाटलांच्या घरी आणि नंतर पुंडलिक पाटलांच्या सहवासात चहा पिऊनच परतीचा रस्ता धरतात – ही परंपरा आजही चालू आहे.

त्यांनी राजकारणात कधीही कोणाच्या विरोधात उभं न राहत, सर्वांच्या मनात घर केलं – हेच त्यांचं यश आहे.
म्हणूनच आज त्यांचा वाढदिवस हा केवळ एक तारखेला साजरा होणारा दिवस नाही, तर माणुसकी, मैत्री आणि सातत्याने दिलेल्या सोबतीचा उत्सव आहे.


🎉 पुंडलिक पाटील महामूलकर यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!
“आपली माणसं जपणारा माणूस, म्हणून तुम्ही नेहमी आमच्या मनात आहात!”

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

error: Content is protected !!