🛑 ब्रेकिंग न्यूज | AIM मीडिया न्यूज तात्काळ बातमी झाली परिणामकारक – प्रशासन खडबडून जागं!
वाघीरा–कुरोशी रस्त्यावरील भराव हटवण्याचे काम वेगात – AIM MEDIA न्यूज बातमीनंतर प्रशासनाची तातडीची कारवाई!

महाबळेश्वर:
महाबळेश्वर तालुक्यातील वाघीरा–कुरोशी रस्त्यावर मुसळधार पावसामुळे वाहून आलेल्या भरावामुळे वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती. या घटनेवर लोकशाही न्यूज मराठीने तात्काळ आणि प्रभावीपणे लक्ष वेधल्यावर प्रशासन खडबडून जागं झालं आणि लगेचच रस्ता मोकळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले.
सार्वजनिक बांधकाम विभाग आणि स्थानिक यंत्रणांनी तत्काळ मशीनरीसह घटनास्थळी धाव घेतली आणि माती-दगड हटवण्याचे काम सुरू करून रस्ता वाहतुकीसाठी पुन्हा खुला करण्यात आला.
ग्रामस्थांनी AIM मीडिया न्यूज वेळीच केलेल्या बातमीचे कौतुक करत प्रशासनाच्या प्रतिसादाचे स्वागत केले आहे.
सततचा पाऊस लक्षात घेता प्रशासन सतर्क राहावं, अशी मागणी देखील जोर धरू लागली आहे.