आईच्या स्मरणार्थ ‘अन्नदानाची वारी’ – पुण्यात पार पडणार भक्तिभावपूर्ण अन्नकोट सोहळा!

आईच्या स्मरणार्थ ‘अन्नदानाची वारी’ – पुण्यात पार पडणार भक्तिभावपूर्ण अन्नकोट सोहळा!

पुणे, सिंहगड रस्ता | २१ जून २०२५

वारकरी संप्रदायाच्या पायवाटांवर निस्सीम श्रद्धा ठेवणाऱ्या कै. लक्ष्मी सखाराम पार्टे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ यंदा एक आगळा-वेगळा आणि पवित्र उपक्रम साकारतोय – आषाढी पायी वारीतील अन्नकोट सोहळा!

पायी वारीला निघालेल्या संतश्रेष्ठ तुकाराम महाराज दिंडी क्र. २१३, शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज प्रासादिक दिंडी, श्रीक्षेत्र पैठण यांच्या वतीने, शनिवार दिनांक २१ जून २०२५ रोजी, सिंहगड रस्ता, पुणे येथील ‘पार्टे हाऊस’ (सनसिटी, आनंदनगर) येथे हा सोहळा संपन्न होणार आहे.

🌿 कार्यक्रमाचे स्वरूप –

सकाळी १० ते १२ – हरिपाठ, आरती, नामस्मरण, भजन

दुपारी १२ ते ३ – महाप्रसाद व अन्नदान

या अन्नकोट सोहळ्यात पुण्यातून, परिसरातून आणि विविध भागांतील वारकरी संप्रदाय, वारीप्रेमी, सेवेकरी सहभागी होणार असून, हा सोहळा केवळ अन्नदान नव्हे तर मातृप्रेम, भक्तिभाव आणि वारी परंपरेच्या साक्षात साद ठरणार आहे.

🪔 “आई म्हणजे वात्सल्याचा दरवळ, अन्नदान म्हणजे तिच्या संस्कारांचा गंध” — विनोददादा पार्टे यांच्या शब्दांतूनच हा सोहळा घडून येतोय.

हा सोहळा लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट – महाराष्ट्र राज्य आणि मातोश्री अनाथ व वयोवृद्धाश्रम (गोशाळा) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला आहे.

अधिक माहिती आणि संपर्कासाठी
विनोददादा पार्टे – ९४२१४४८९९८ / ८८८८९७५५५०

“पंढरीची वाट, आईच्या आठवणींच्या सावलीतून…”

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

error: Content is protected !!