छोट्या चिमुकल्यांचं गोड स्वागत – मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले कॅडबरी वाटत मुलांमध्ये रमले

छोट्या चिमुकल्यांचं गोड स्वागत – मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले कॅडबरी वाटत मुलांमध्ये रमले

कुडाळ (ता. जावळी), प्रतिनिधी:इम्तियाज मुजावर
शासनाच्या उच्च पदावर असूनही जमिनीशी नातं कायम जपणारे आणि प्रत्येक निर्णयात मानवी स्पर्श ठेवणारे मंत्री म्हणून बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा वेगळा ठसा राहिला आहे. याच परंपरेला साजेसा प्रसंग जावळी तालुक्यातील दुर्गम डोंगराळ भागात असलेल्या मेंढा गावात घडला. नव्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी ते शाळेत पोहोचले आणि लहान चिमुकल्यांचं गोड चॉकलेट देऊन खास स्वागत केलं.

ग्रामीण भागातील सरकारी शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी व शालेय शिक्षणात गुणवत्ता टिकवण्यासाठी नेहमीच आग्रही भूमिका घेणारे शिवेंद्रसिंहराजे यांनी आपल्या मतदारसंघातील विविध प्राथमिक शाळांना भेटी देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी मेंढा येथील शाळेला भेट दिली.

पहिल्या दिवसाचा खास क्षण – चॉकलेट व शालेय साहित्य वाटप
शाळा सुरू होताच लहान मुलांचे डोळे आनंदाने चमकले – कारण त्यांच्या स्वागतासाठी स्वतः मंत्री साहेब उपस्थित होते. शिवेंद्रसिंहराजेंनी प्रत्येक विद्यार्थ्याला गोडसर सरप्राइज दिलं – म्हणजेच कॅडबरी चॉकलेट! या छोट्याशा कृतीने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य खुललं आणि त्यांचं पहिलंवहिलं शाळेतील पाऊल एक संस्मरणीय अनुभव ठरलं.

त्याचबरोबर विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटपही करण्यात आलं. वह्या, पेन, पाटी, पेन्सिल, रब्बर यांसारख्या अत्यावश्यक वस्तूंचं संच विद्यार्थ्यांच्या हाती देत मंत्री महोदयांनी शिक्षणासाठी आवश्यक आधार दिला.
मुलांमध्ये रमून गेलेल्या शिवेंद्रसिंहराजेंनी त्यांच्या गप्पांमधून मुलांशी स्नेहपूर्ण संवाद साधला. ‘काय हवंय?’, ‘कशात आवड आहे?’, ‘शिकून काय बनायचंय?’ असे सहज प्रश्न विचारत त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्याशी संवाद साधला. हे दृश्य पाहून शिक्षक आणि पालकही भारावून गेले.
शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, “सरकारी शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. मात्र प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणासाठी योग्य वातावरण मिळणं अत्यावश्यक आहे. यासाठी आमच्या जावळी मतदारसंघातील सर्व शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण व मूलभूत सुविधा उपलब्ध होतील, यासाठी मी स्वतः पाठपुरावा करणार आहे.”


या कार्यक्रमामुळे मेढा गावात उत्साहाचं वातावरण होतं. स्थानिक ग्रामस्थ, शिक्षक, पालक यांनी एकमुखाने सांगितलं की, “शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांना असा आनंददायी अनुभव मिळणं, ही गोष्ट आयुष्यभर लक्षात राहील.”
या प्रसंगी स्थानिक पदाधिकारी, शालेय समिती सदस्य, मुख्याध्यापक, शिक्षक, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकमुखाने मंत्री महोदयांचे अभिनंदन करत त्यांच्या संवेदनशील दृष्टिकोनाचं कौतुक केलं.



या उपक्रमातून एक गोष्ट निश्चितपणे स्पष्ट होते – मंत्री म्हणून पद सांभाळताना शिवेंद्रसिंहराजेंना शिक्षण, ग्रामीण विकास आणि माणूसकी यांचा समतोल साधायचा आहे. या छोट्याशा भेटीद्वारे त्यांनी एक मोठा संदेश दिला – की मुलं ही देशाचं भविष्य आहेत आणि त्यांच

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

error: Content is protected !!