साताऱ्याचा सुवर्णवीर! पै. सुधीर पुंडेकर यांना आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक” कुस्तीचा थरार(व्हिडीओ)

–“साताऱ्याचा सुवर्णवीर! पै. सुधीर पुंडेकर यांना आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक”

सातारा ….किर्गीझस्थानमध्ये पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय स्पोर्ट्स गेम्स 2025 मध्ये साताऱ्याच्या फलटण तालुक्यातील मुळीकवाडी गावचा सुपुत्र, कुस्ती क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय पट्टाधारक पै. सुधीर पुंडेकर यांनी भारतासाठी सुवर्णपदक पटकावलं आहे!

भारत मातेच्या जयघोषात सुधीर पुंडेकर यांनी अखेरच्या क्षणापर्यंत जिद्दीनं झुंज दिली आणि परदेशी भूमीवर भारतीय झेंडा अभिमानाने फडकावला. “राष्ट्र को समर्पित… सब कुछ समर्पित” या शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त करत, भारतासाठीच नव्हे तर संपूर्ण साताऱ्याच्या कुस्ती परंपरेचा गौरव केला आहे.


ही फक्त एक वैयक्तिक कामगिरी नाही, ही आहे जिल्ह्याच्या मातीतील घडलेल्या खेळाडूच्या आंतरराष्ट्रीय यशाची गाथा. मुळीकवाडीच्या या सुपुत्राचा विजय हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे!

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

error: Content is protected !!