(सातारा इम्तियाज मुजावर)…आज फादर्स डे… आणि याच निमित्ताने खास एक भावुक क्षण साताऱ्यात पाहायला मिळाला.
श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांनी आज आपल्या वडिलांना – छत्रपती प्रतापसिंहराजे भोसले यांच्या प्रतिमेला अभिवादन करून फादर्स डे साजरा केला. या वेळी क्षण अत्यंत भावुक होते – उदयनराजे यांचे डोळे नकळत पाणावले.

यानंतर त्यांच्या चिरंजीव छत्रपती वीर प्रतापसिहराजे भोसले यांनी आपल्या पिताश्रींचा आशीर्वाद घेत, त्यांना केक खाऊ घालत फादर्स डे साजरा केला.

त्यांनी आपल्या वडिलांना मिठी मारत गळाभेट दिली आणि उपस्थित सर्वांच्या डोळ्यांत अश्रू दाटून आले. हे दृश्य पाहून अनेकजण भावूक झाले होते.
राजघराण्यातील या पिढ्यानपिढ्याच्या प्रेमाचं हे दृश्य खरंच सगळ्यांच्या मनाला स्पर्शून गेलं…
