
पाचगणी | प्रतिनिधी
पर्यटनाचे थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरमध्ये ५ जून २०२५ रोजी घडलेल्या मागासवर्गीय महिलांवरील अमानुष मारहाणीच्या घटनेनं संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळवली आहे. यातील अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे या घटनेविरोधात सामाजिक कार्यकर्ते किरण गोरखनाथ शिंदे यांनी साहसी भूमिका घेत अन्यायग्रस्त महिलांसाठी सर्वप्रथम प्रखर आवाज उठवला, आणि त्यांच्या या आवाजाला ‘AIM मीडिया ने सजग माध्यम म्हणून परखडपणे बातमी प्रसिद्ध करून दणका दिला पाठींबा दिला.
घटना महाबळेश्वरमधील ‘द बाईक शांती व्हिला’ पंचतारांकित हॉटेल परिसरात घडली होती. भंगार गोळा करणाऱ्या चार महिलांना – सोनाली राहुल गोळे, सपना सागर गोसावी, अश्विनी विनोद वाघमारे आणि अनिता दिलीप जाधव (सर्व रा. सिद्धनाथ वाडी, वाई) – हॉटेलच्या कर्मचाऱ्यांकडून बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना सीसीटीव्हीमध्ये स्पष्टपणे कैद झाली आहे.
घटनेनंतर संबंधित महिलांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली असता, त्यांच्या तक्रारीऐवजी त्यांच्यावरच चोरीचा गुन्हा दाखल करण्यात येईल, असा दबाव टाकण्यात आला, असा गंभीर आरोप किरण शिंदे यांनी केला. त्यांनी प्रसारमाध्यमांमार्फत स्पष्ट इशारा दिला की, “जर या महिलांना न्याय मिळाला नाही, तर आम्ही थेट महाबळेश्वर पोलीस ठाण्यासमोर आंदोलन छेडू.”
याच पार्श्वभूमीवर AIM MEDIA ‘’ने या प्रकरणाचा गंभीर पाठपुरावा करत प्रशासन आणि पोलीस यंत्रणेवर जनतेच्या दबावाची जाणीव करून दिली. या पाठपुराव्याचा परिणाम म्हणून अखेर महाबळेश्वर पोलिसांनी अज्ञात तीन इसमांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सदर गुन्हा BNS 2023 चे कलम 74, 115(2), 351(2), 352 आणि 3(5) अंतर्गत दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक रौफ इनामदार करत आहेत.

–AIM मीडियाचा आवाज अन्यायाविरुद्ध
या गंभीर घटनेनंतर सामाजिक कार्यकर्ते किरण शिंदे यांचा प्रामाणिक प्रयत्न आणि AIM मीडिया ’च्या न्यायासाठी दिलेल्या आवाजाने आज एक टप्पा गाठला आहे.
– अन्यायग्रस्त महिलांच्या बाजूने उभे राहणे
– सामाजिक जबाबदारी पार पाडणे
– प्रशासनास सजग करणे
– पोलिसांवर योग्य ते जनतेचे दडपण टाकणे
हे सर्व मुद्दे ‘ AIM MIDIA ’ने आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून सिद्ध केले आहेत.
पुढे काय?
सध्या गुन्हा नोंद झाला असला तरी या प्रकरणातील आरोपींना अटक, सीसीटीव्ही पुराव्याची तपासणी, आणि महिलांना न्याय मिळवून देणं हा पुढील महत्त्वाचा टप्पा आहे.
सामाजिक कार्यकर्ते, प्रसारमाध्यमं, आणि जनतेच्या एकत्रित दबावामुळेच हा प्रश्न केवळ बातमी न राहता न्यायाच्या दिशेने एक पाऊल ठरतो आहे.
‘ऑन लाईन AIM मीडिया ’ने ही घटना समाजासमोर आणली नसती, तर कदाचित या महिलांची कैफियत दुर्लक्षित झाली असती. आज त्यांच्या बाजूने उभे राहणारा आवाज म्हणजे किरण शिंदे आणि ‘ AIM मीडिया ‘चा संयुक्त परिणाम आहे.