डिजिटल मिडियाला राजमान्यता – राजा माने यांच्या प्रयत्नांना यश (व्हिडीओ)


डिजिटल मिडियाला राजमान्यता – राजा माने यांच्या प्रयत्नांना यश

मुंबई : विशेष प्रतिनिधी इम्तियाज मजावर
महाराष्ट्रातील डिजिटल मीडियासाठी गेल्या सहा वर्षांपासून सुरू असलेल्या मागणीला अखेर यश आले असून, महाराष्ट्र शासनाने डिजिटल मीडियासाठी जाहिरात अधिसूचना जारी करून त्याला राजमान्यता दिली आहे. यामध्ये डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना, महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश आले असून, संस्थापक अध्यक्ष मा. राजा माने साहेब यांची भूमिका अत्यंत मोलाची ठरली आहे.

मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार साहेब तसेच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मा. चंद्रकांतदादा पाटील यांच्या सहकार्याने ही ऐतिहासिक घोषणा साकार झाली आहे.

डिजिटल माध्यमांनी गेल्या काही वर्षांत समाजप्रबोधन, जनजागृती व लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून भरीव कार्य केले आहे. या माध्यमांना मिळालेली ही राजमान्यता म्हणजे त्यांच्या कार्याची अधिकृत दखल असून, यामागे राजा माने साहेब यांचे सातत्यपूर्ण पाठपुरावा, शासन दरबारी केलेले सुसंवाद व संघटनेच्या माध्यमातून उभे केलेले प्रभावी नेतृत्व हे मूलभूत कारण आहे.

राजा माने साहेब यांचे विशेष कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे आज डिजिटल पत्रकारांना नवसंजीवनी मिळाली असून, महाराष्ट्रातील हजारो डिजिटल संपादक व पत्रकारांचा आत्मविश्वास अधिक दृढ झाला आहे.


aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

error: Content is protected !!