ड्रग्ज माफियांचा नायनाट नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोषीपुढे एक आव्हान.. श्रीरंग काटेकर

ड्रग्ज माफियांचा नायनाट नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोषीपुढे एक आव्हान.. श्रीरंग काटेकर. सातारा… सातारा जिल्ह्यात ड्रग्ज माफी यांचे पाले मुळे गावागावात वाढीवस्तीपर्यंत पोहोचले आहे हे नष्ट करण्याचे मोठे आव्हान नूतन जिल्हा पोलीस प्रमुख तुषार दोषी यांच्यापुढे आहे सातारा जिल्ह्यातील तरुणाई मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांच्या आहारी जात असून यामुळे पालक वर्ग चिंतेत आहेत विशेषतः शालेय व महाविद्यालयीन तरुणाई याकडे विशेष आकर्षिले जात आहे त्यामुळे ड्रग्ज माफियांचा जिल्ह्यात सुळसुळाट झाला आहे यावरती अंकुश ठेवण्यासाठी नूतन जिल्हा पोलीस प्रमुख यांनी ठोस कृतिशील धोरण पोलीस दलाकडून आखण्यात यावे अशी अपेक्षा जिल्हा वासयांची आहे जिल्ह्याला पडलेला ड्रग्सचा विळखा तरुणाईसाठी घातक ठरणार असून यावरती वेळीच उपायोजना होणे गरजेचे आहे ड्रग्ज माफियांच्या नायनाट हे नूतन जिल्हा पोलीस प्रमुखांपुढे एक आव्हान म्हणून उभे राहिले आहे हे आव्हान ते सक्षमपणे पेलतील याबाबत सातारा वासियाना खात्री आहे पोलीस दलातील त्यांचा प्रदीर्घ अनुभव व त्यांनी आजपर्यंत केलेली कामगिरी पाहता त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत सातारा जिल्ह्यात गांजा चरस एमडी व विविध अंमली पदार्थांचे मोठे रॅकेट असून ते उध्वस्त करणे काळाची गरज आहे आज पर्यंत सातारा पोलीस दलाने विविध ठिकाणी छापेमारी करून ड्रग्ज माफियांचा नायनाट करण्याचा प्रयत्न केला आहे तरीही हे ड्रग्ज माफिया विविध मार्गाने तरुणांपर्यंत पोहोचत आहेत नूतन जिल्हा पोलीस प्रमुख हे कर्तव्यदक्ष आहेत त्यांनी जिल्ह्यातील प्रश्नांनाचा बारकाईने अभ्यास करून ड्रग्ज माफियांचे अड्डे उध्वस्त करावेत… चौकट पुणे मुंबईचे ड्रग्जचे लोन आता सातारा जिल्ह्यात पसरले आहे त्यामुळे हा सामाजिक विषय निर्माण झाला आहे अंमली पदार्थाच्या सेवन यामध्ये तरुणाई मध्ये मोठे आकर्षण वाढले आहे हे चिंतेची बाब आहे रेव्ह पार्टी व चंगळवादी वृत्ती याच्या आहारी गेलेली तरुणाई वास्तव जीवनाचे भान विसरलेले आहे नुकतेच तासवडे एमआयडीसी येथे दिनांक 23 मे रोजी पोलीस दलाने अमली पदार्थाच्या ठिकाणी छापे मारून सहा कोटी रुपयाचे ड्रग्ज जप्त करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे यापूर्वीही सातारा शहरात सुशिक्षित वर्गातील तरुणाईला ड्रग्जचे इंजेक्शन विकत घेताना पोलीसिनी पकडले आहे जिल्ह्याच्या विविध भागात ड्रग्स वितरित करणारी यंत्रणा मोठ्या प्रमाणात कार्यरत असून त्याबाबत अधिक शोध पोलीस दलाने घ्यावा.. चौकट… नूतन जिल्हा पोलीस प्रमुख तुषार दोषी यांचा पोलीस दलात प्रदीर्घ अनुभव असून ते जिल्ह्याचे विविध समस्या व प्रश्नांची उकल करून आपले कर्तुत्व ते सिद्ध करतील याची खात्री सातारा वासियांना आहे.. श्रीरंग काटेकर सातारा

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

error: Content is protected !!