आ.अतुल भोसले यांची जिल्हाध्यक्ष पदी निवड – साताऱ्यात भाजपचा नवा अध्याय सुरू! जावळीच्या सरहद्दीवर आ भोसले यांचे सौरभ शिंदेंकडून जल्लोषात स्वागत!

सातारा – कराडचे आमदार आणि भाजपचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांच्या नियुक्तीमुळे सातारा जिल्ह्यात भाजप कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह व उमेद निर्माण झाली आहे. प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सौरभ शिंदे यांनी भोसले यांचे मनापासून अभिनंदन केले.

सौरभ शिंदे म्हणाले, “अतुल भोसले यांची जिल्हाध्यक्षपदी निवड ही साताऱ्याच्या भाजप कार्यकर्त्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. त्यांच्या ठाम नेतृत्वाखाली पक्ष आणखी सशक्त होईल आणि विशेषतः युवकांना संघटनात्मक कामात संधी मिळेल.”

भोसले आणि शिंदे यांच्यातील जवळीक आणि सामंजस्यामुळे साताऱ्यातील भाजपच्या पुढील धोरणात्मक वाटचालीवर सर्वांचे लक्ष लागले आहे. आगामी काळात या नेतृत्वाखाली सातारा भाजपचा नवा इतिहास घडणार, याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

error: Content is protected !!