. कष्ट, जिद्द आणि यशाची इमारत — राजेंद्रशेठ पार्टेंची अभूतपूर्व कामगिरी!

पाचगणीच्या हिरव्या निसर्गाच्या कुशीत वसलेलं ‘रेनफॉरेस्ट’ हॉटेल आज यशाचं प्रतीक ठरलं आहे. पण या यशाच्या पाठीमागे लपलेली कहाणी आहे एका सामान्य माणसाच्या असामान्य जिद्दीची — राजेंद्र वसंतराव पार्टे उर्फ राजुशेठ! मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणून राजुशेठ पार्टे यांची ओळख संपूर्ण महाराष्ट्रातल्या त्यांच्या जोडलेल्या मित्रांच्या मनात कायमस्वरूपी आहे त्यांचा आज वाढदिवस या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या मित्रांसाठी हा उत्सव असतो प्रत्येक मैफिलीमध्ये राजेंद्र शेठ जेव्हा येतात तेव्हा ती मैफिलीला आणखीन रंगत येते राजेंद्र शेठजी इंट्री म्हणजे मित्रांचा भरलेला दरबारात राजेंद्र शेठ म्हणजे एक त्या दरबाराची शान म्हणून समजले जाते दिलदार स्वभावाचे मीतभाषीय शांत संयमी मित्रांसाठी 24 तास सात दिवस कायमस्वरूपी सज्ज आणि तयार असणारे राजेंद्र शेठ प्रत्येक मित्राला कायमस्वरूपी हवेहवेसे वाटतात त्यांच्या वाढदिवसाला महाराष्ट्रातून त्यांनी जोडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या शुभेच्छा येत असतात हा ठरलेला नित्यक्रम रेनफॉरेस्ट रेस्टॉरंट त्यांनी निर्माण केलेले हे एक मैत्रीचे प्रतीक आहे या ठिकाणी अनेक मित्रांचे संगम होतात आणि इथूनच त्यांनी जोडलेल्या नात्यांचा मैत्रीचा परिसस्पर्श प्रत्येकाला अनुभवास मिळतो आणि गोरगरीब दिन दुबळ्या व्यक्तींना बंद मोठी ने मदत करणारे त्यांच्या मदतीला धावून जाणारे राजेंद्र शेठ अनेक वेळा पहावयास मिळतात राजेंद्र शेठ सारखा व्यक्ती नगरसेवक म्हणून व्हावा म्हणून त्यांच्या सगळ्या मित्रांसह त्यांच्या मतदारसंघात अनेकांची इच्छा आहे असा स्वच्छ विचाराचा दिलदार मनाचा नेता म्हणून पाचगणी करांना पहावयास अनेक वेळा आवडेल असे अनेक वेळा त्यांचे मित्र समूह सांगून जातात मात्र या सांगण्याला विनम्रपणे हात जोडून राजेंद्र शेठ कायमस्वरूपी मला तुमच्या हृदयात मनात रहावयाची संधी द्या आपणाला राजकारण नको असे मिस्कीलपणे सांगून जातात मात्र पाचगणीची जनता आज देखील त्यांना नेतृत्व म्हणून पहावयास आतुर आहे

शालेय शिक्षण महात्मा फुले मराठी माध्यमातून पूर्ण केलेला राजेंद्र पार्टे. एका सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेला, पाचगणी पालिकेत नगरसेवक असलेल्या वसंतराव पार्ट्यांचा मुलगा. पण वडिलांनी निवडलेला राजकारणाचा सरळमार्गी प्रवास, घरच्या आर्थिक अडचणी आणि शिक्षण अर्धवट सोडून राजेंद्रला कामगार म्हणून रस्त्यावर उतरावं लागलं. ट्रक क्लिनरपासून सुरू झालेला हा प्रवास हॉटेल मालकापर्यंत पोहोचला, पण या प्रवासात राजुशेठ यांनी जे काही भोगलं, ते ऐकून कोणाच्याही डोळ्यांत पाणी येईल.

१९९७ मध्ये वाळू वाहतुकीचा व्यवसाय सुरू केला. एक ट्रक घेतला, नंतर दुसरा. दिवस-रात्र कष्ट, मेहनत आणि प्रामाणिकपणा यांच्या जोरावर व्यवसाय उभा राहिला. वाटलं, आता सगळं सुरळीत सुरू आहे. पण नियतीचं वेगळंच काही मनात होतं. एक भीषण अपघात झाला आणि राजुशेठच्या गाडीची चाक थांबली. व्यवसाय कोसळला. कर्जाचा डोंगर वाढू लागला. मित्र, नातेवाईक दूर जाऊ लागले. ‘कर्ज काढा आणि ते फेडा’ या चक्रात राजुशेठ अक्षरशः अडकून गेले. एकेक करून गाड्या विकल्या. पाण्याचा टँकर विकला. पण तरीही कर्जाचा आकडा कमी होईना. २००० ते २००७ या काळात त्यांनी काय भोगलं, ते शब्दात सांगणं कठीण आहे.

अशा कठीण काळात काही मित्रांनी पाठबळ दिलं. राजू भगत, नितीन मोरे आणि भारत पुरोहित या मित्रांनी त्यांना धीर दिला. याच काळात एक निर्णय त्यांच्या आयुष्याला कलाटणी देऊन गेला — पारशी पॉईंट समोरील एक छोटा प्लॉट. इथे त्यांनी टी-आँगलचं एक छोटसं रेस्टॉरंट सुरू केलं. नाव दिलं — ‘रेनफॉरेस्ट’.

प्रथमदर्शनी साधं दिसणारं हे रेस्टॉरंट म्हणजे राजुशेठच्या मेहनतीचं आणि जिद्दीचं प्रतिक ठरलं. २००८ पासून सुरू झालेलं हे रेस्टॉरंट हळूहळू पर्यटकांच्या पसंतीस येऊ लागलं. आज इथं २५ रूम्स, बार, रेस्टॉरंट आणि ६० कर्मचाऱ्यांचा स्टाफ काम करतो. कर्ज फेडलं, गाड्या परत घेतल्या, नाव मिळवलं, पैसा मिळवला, पण सर्वात महत्त्वाचं — आत्मसन्मान परत मिळवला.

‘मुझे ऊंचाइयों पर देखकर हैरान है बहुत लोग, पर किसी ने मेरे पैरो के छाले नहीं देखे!’ — या ओळी आज राजुशेठच्या संघर्षाची कहाणी सांगतायत. आज रेनफॉरेस्ट म्हणजे पाचगणीच्या पर्यटन नकाशावरचं एक ठळक नाव आहे. पण या नावामागे उभं आहे एका माणसाचं स्वप्न, त्याची जिद्द आणि अपार मेहनत. राजेंद्र पार्टे — तुम्ही फिनिक्स पक्षासारखे राखेतून उठलात. सलाम तुमच्या जिद्दीला, कर्तृत्वाला आणि अचाट इच्छाशक्तीला!

वसीम शेख 8888311121

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

error: Content is protected !!