सातारा पोलीस दलाची चमकदार कामगिरी! क्रीडा प्रबोधिनीतील ३ बॉक्सरची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड


सातारा पोलीस दलाची चमकदार कामगिरी! क्रीडा प्रबोधिनीतील ३ बॉक्सरची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

सातारा | प्रतिनिधी इम्तियाज मुजावर
सातारा जिल्हा पोलीस क्रीडा प्रबोधिनीने पुन्हा एकदा आपली उत्कृष्ट कामगिरी सिद्ध करत महाराष्ट्राच्या क्रीडा नकाशावर आपली ठसा उमठवला आहे. यवतमाळ येथे १६ ते १७ एप्रिल २०२५ रोजी पार पडलेल्या १९ वर्षाखालील महाराष्ट्र राज्यस्तरीय बॉक्सिंग निवड चाचणीत प्रबोधिनीतील ७ खेळाडूंनी पदकांची लयलूट करत यशाची मोठी घौडदौड केली आहे.

या स्पर्धेत प्रबोधिनीतील चि. सैफअली साजिद झारी (९० किलो) आणि कु. श्रुती सचिन शिंदे (७०-७५ किलो) यांनी सुवर्णपदक पटकावून थेट राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात स्थान मिळवलं आहे. त्यांच्या बरोबर कु. प्रांजली दिपक रावळ हिने रौप्य पदक, तर कु. अपूर्वा कदम, कु. सृष्टी मोरे, चि. रोहन शिंदे आणि चि. श्रीराज शिंदे यांनी कांस्यपदक मिळवून साताऱ्याच्या नावाला उजाळा दिला.

याशिवाय, शालेय राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत चि. शौर्य योगेश बनकर याने सुवर्ण पदक पटकावून आगामी १४ वर्षांखालील राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड मिळवली आहे.

ही सर्व कामगिरी प्रबोधिनी व्यवस्थापक श्री. सुनिल सपकाळ, सहा. व्यवस्थापक सॅम्युअल भोरे, तसेच प्रशिक्षक पो.ह.वा. सागर जगताप (एन.आय.एस.), पुजा शिंदे यांच्या अथक मार्गदर्शनामुळे शक्य झाली आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल पोलीस अधीक्षक श्री. समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, उप-अधीक्षक अतुल सबनीस, निरीक्षक राजु शिंदे, तसेच मानवी संसाधन कार्यालयाचे पो.उ.नि. सुनिल चिखले यांनी खेळाडूंना तसेच प्रशिक्षक व व्यवस्थापकांना मनःपूर्वक अभिनंदन दिले असून, आगामी स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


सातारा पोलीस दलाच्या क्रीडा शाखेने साकारलेलं हे यश हे केवळ जिल्ह्याचं नव्हे तर राज्याच्या शौर्य आणि क्रीडामानाच्या उज्वलतेचं प्रतीक ठरत आहे!


aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

राजकीय आखाडा

दहा कोटींचा नफा देणाऱ्या चेअरमनवरच अविश्वास? – वसंतराव मानकुमरे यांचा थेट इशारा!” 🛑जावळी बँकेतून ‘भोसले-गवळी’ संचालकांवर सडकून टीका; सहकार परिषदेतून ‘सरळ करण्याचा’ घणाघात!(व्हिडीओ)

error: Content is protected !!