मिनी काश्मीर’ महाबळेश्वरच्या शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी – मिळणार स्वतंत्र बाजार समिती”

मिनी काश्मीर’ महाबळेश्वरच्या शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी – मिळणार स्वतंत्र बाजार समिती”

पाचगणी (प्रतिनिधी)इम्तियाज मुजावर – थंड हवेचं पर्यटनस्थळ, ‘मिनी काश्मीर’ म्हणून ओळखलं जाणारं महाबळेश्वर आता कृषी क्षेत्रातही नवे युग सुरू करत आहे. राज्य शासनाच्या ‘एक तालुका – एक बाजार समिती’ या धोरणात्मक निर्णयाअंतर्गत महाबळेश्वर तालुक्याला स्वतःची स्वतंत्र कृषी उत्पन्न बाजार समिती मिळणार असल्याची आनंददायक माहिती समोर आली आहे.

सद्यस्थितीत महाबळेश्वर व जावळी तालुक्यांची एकत्रित बाजार समिती कार्यरत आहे. मात्र शासनाच्या नवीन धोरणानुसार, प्रत्येक तालुक्यासाठी स्वतंत्र बाजार समिती स्थापन करण्यात येणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता महाबळेश्वरला स्वतःची स्वतंत्र बाजार समिती मिळणार आहे, अशी अधिकृत माहिती परळी विभागामार्फत देण्यात आली आहे.

राज्यातील 358 तालुक्यांपैकी 68 तालुक्यांमध्ये अद्याप बाजार समिती अस्तित्वात नाही. त्यामुळे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील अर्थसंकल्पीय अधिवेशनात याबाबत विशेष घोषणा करण्यात आली. या योजनेमुळे महाबळेश्वर तालुक्यातील स्ट्रॉबेरी, रासबेरी, मलबेरी, मधुपक्षी फलोत्पादन, मधमाशी पालन, मत्स्यपालन, वन उत्पादने यांना स्थानिक पातळीवर बाजारपेठ मिळणार असून, शेतकऱ्यांना अधिक फायदा मिळणार आहे.

या निर्णयामुळे शेतकऱ्यांना उत्पादन विक्रीसाठी लांबचा प्रवास करावा लागणार नाही, त्यांचे आर्थिक नुकसान होणार नाही, तसेच स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधीही उपलब्ध होतील.

महाबळेश्वर परिसरात या निर्णयाचे स्वागत करण्यात येत असून शेतकरी, व्यापारी आणि स्थानिक नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

“हा निर्णय म्हणजे महाबळेश्वरच्या शेती व फलोत्पादन व्यवसायासाठी नवा टप्पा आहे. सरकारचे आभार!” असे प्रतिपादन अनेक स्थानिक शेतकरी व व्यावसायिकांनी केले.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

error: Content is protected !!