
“शिंदेशाही सृष्टीच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल – महादजी शिंदेंच्या शौर्यभूमीत राष्ट्रीय स्मारक आणि पर्यटन विकास आराखड्यासाठी हालचाली सुरू!”
सातारा जिल्ह्यातील दरे या पवित्र मातीतील शौर्यभूमीत, महाराष्ट्राचे खंबीर आधारस्तंभ, डॅशिंग नेतृत्व व मुख्यमंत्रीपदाचे भावी चित्र असलेले उपमुख्यमंत्री आणि नगरविकास, सार्वजनिक बांधकाम मंत्री आदरणीय एकनाथ भाई शिंदे यांची प्रत्यक्ष भेट घेण्यात आली. या भेटीत अनेक ऐतिहासिक आणि भविष्यातील पिढ्यांसाठी अभिमान निर्माण करणाऱ्या योजनांचा प्रस्ताव सादर करण्यात आला

.
शिंदे साहेबांच्या मूळ गावात म्हणजेच ऐतिहासिक कण्हेर खेड, येथे श्रीमंत महाराज महादजी शिंदे यांचे राष्ट्रीय स्मारक व्हावे, तसेच 100 एकर जागेवर शिवसृष्टीच्या धर्तीवर “शिंदेशाही सृष्टी” उभारण्यात यावी, असा ठोस मागणीचा प्रस्ताव देण्यात आला. याच संदर्भाने, दिल्ली येथील “श्रीमंत महादजी शिंदे राष्ट्रीय पुरस्कार” सोहळ्यातही हे निवेदन सादर करण्यात आले होते.

या ऐतिहासिक मागणीला साकार रूप देण्यासाठी, अर्थसंकल्पात दुर्लक्षित राहिलेल्या या ठिकाणी पर्यटन विकासासाठी DPR (विकास आराखडा) तयार करण्याच्या दृष्टीने मंत्रालयात बैठक घेण्याची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. या संदर्भात सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराजे देसाई, तसेच कलेक्टर, प्रांताधिकारी, तहसिलदार, भू अभिलेख अधिकारी, आर्किऑलॉजिस्ट, इतिहासकार आणि संबंधित विभागीय अधिकाऱ्यांची उपस्थिती आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.

या प्रसंगी शिंदे सरकार प्रतिष्ठान, राजे प्रतिष्ठान चे संस्थापक श्री. अमोल भाऊ, कुणाल शेठ, तानाजी भाऊ अध्यक्ष, बाबा, शुभम सपकाळ (उद्योजक) आणि अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
भाई एकनाथ शिंदे यांनी अत्यंत आत्मीयतेने वेळ दिली आणि मंत्री शंभुराजे देसाई यांच्याशी चर्चा करून लवकरच बैठक आयोजित करू, असे आश्वासन दिले. ही बाब केवळ ऐतिहासिक गौरवासाठी नव्हे, तर राज्याच्या पर्यटन, संस्कृती आणि युवक प्रेरणेच्या दृष्टीनेही फार मोठे पाऊल ठरणार आहे.

शिंदेशाही सृष्टी – महाराष्ट्राच्या इतिहासात नव्या पर्वाची सुरुवात!