उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व – दुर्लक्षित तालुक्याला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा धडाडीचा संकल्प


(इम्तियाज मुजावर सातारा)उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व – दुर्लक्षित तालुक्याला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा धडाडीचा संकल्प

सातारा जिल्ह्यातील दुर्गम भागांमध्ये जलसंधारण, शेती विकास, पर्यटन आणि पर्यावरण संरक्षणाच्या दिशेने ऐतिहासिक पावले

सातारा जिल्ह्यातील कोयना, कांदाटी, सोळशी, जावळी व महाबळेश्वर तालुक्याचा गेल्या अनेक वर्षांपासून विकासाच्या प्रवाहापासून काहीसा तुटलेला भाग अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दूरदृष्टीने आणि निर्णायक नेतृत्वाने नवजीवनाकडे वाटचाल करू लागला आहे. जलव्यवस्थापन, रस्ते कनेक्टिव्हिटी, पर्यटन प्रकल्प आणि स्थानिक रोजगार निर्माणाच्या विविध उपक्रमांतून या भागाचे सोनं करण्याचा त्यांच्या नेतृत्वाखाली प्रयत्न सुरु आहे.

जलसंधारणातून शाश्वत शेतीकडे वाटचाल

या विभागातील शेती आजवर पाण्याच्या अभावामुळे मर्यादित राहिली होती. मात्र, मंत्री संजय राठोड यांच्या सहकार्याने साखळी बंधारे, कोल्हापुरी बंधारे, चेक डॅम्स आणि मातीचे बंधारे यांसारखे जलसाठा प्रकल्प मंजूर करून पाण्याचे सुसूत्र नियोजन करण्यात आले आहे. यामुळे आता शेतकऱ्यांना वर्षभर सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे. लिफ्ट इरिगेशनच्या माध्यमातून प्रत्येक शेतात पाणी पोहोचवण्याचा संकल्पही यामागे आहे. आज अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या पाहणी दौऱ्यात याची खात्री करून देण्यात आली.

‘नवीन महाबळेश्वर’ – पर्यटन आणि रोजगारासाठी गेम चेंजर प्रकल्प

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘नवीन महाबळेश्वर’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची घोषणा करताच संपूर्ण भागात आशावादाचे वातावरण निर्माण झाले आहे. सुरुवातीस 250 गावांचा अपेक्षित सहभाग असलेला हा प्रकल्प आता 292 गावांच्या उत्स्फूर्त सहभागाने अधिक व्यापक झाला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून पर्यटनाला चालना मिळणार असून हजारो स्थानिक तरुणांना गाव सोडून रोजगारासाठी बाहेर जावे लागणार नाही.

“माझं स्वप्न आहे की या भागातील एकही तरुण गाव सोडून शहरात नोकरीसाठी जाऊ नये,” असे सांगून शिंदे यांनी स्थानिक रोजगार निर्मितीस प्राधान्य दिले असल्याचे स्पष्ट केले.

राजकारणापेक्षा पर्यावरण आणि लोकहित केंद्रस्थानी

एकनाथ शिंदे हे केवळ एक राजकारणी नाहीत, तर ते पर्यावरणप्रेमी आणि लोकाभिमुख कार्यकर्ताही आहेत. “मुंबईचं राजकारण मुंबईतच ठेवलं आहे,” असं स्पष्ट सांगत त्यांनी परिसरातील जनतेशी थेट संवाद साधणं आणि वृक्षारोपणासारख्या उपक्रमात सक्रिय सहभाग घेणं हे त्यांचं वैशिष्ट्य आहे.

ते स्वतः एवा, कडू सफरचंद आणि इतर फळझाडांचे हजारो वृक्ष लावून पर्यावरण संवर्धनाचे उत्तम उदाहरण ठरले आहेत. शेतकऱ्याच्या घरात जन्मलेले आणि मातीशी जोडलेपण जपणारे शिंदे, गावात आल्यावर उपमुख्यमंत्रिपद बाजूला ठेवून एक ‘गावकरी’ म्हणून कामाला लागतात.

जनतेशी थेट संवाद, प्रत्येक समस्येला समाधान

शेतकऱ्यांच्या, तरुणांच्या आणि गावकऱ्यांच्या समस्या ऐकून त्यावर तत्काळ निर्णय घेण्याची त्यांची कार्यशैली प्रशासनात वेगळेपण निर्माण करते. “इथे आलो म्हणजे उपमुख्यमंत्री नाही, गावकरी आहे,” असं ते ठामपणे सांगतात आणि त्यातूनच त्यांचा कार्यकर्तृत्वाचा खरा झळाळा दिसून येतो.

एक नेतृत्त्व, अनेक दिशा – विकासाचा नवा चेहरा

या सर्व प्रकल्पांच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांनी हे दाखवून दिलं आहे की, मजबूत राजकीय इच्छाशक्ती आणि लोकाभिमुख दृष्टिकोन असेल तर कोणताही दुर्लक्षित भाग विकासाच्या केंद्रस्थानी आणता येतो.

‘नवीन महाबळेश्वर’ प्रकल्प, जलसंधारण योजना, स्थानिक रोजगार निर्मिती, पर्यावरण संवर्धन, आणि जनसंपर्क – या सर्व क्षेत्रांमध्ये शिंदे यांचे नेतृत्व हा विश्वास निर्माण करत आहे की महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलवण्याचे स्वप्न आता प्रत्यक्षात साकार होत आहे.


aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

राजकीय आखाडा

दहा कोटींचा नफा देणाऱ्या चेअरमनवरच अविश्वास? – वसंतराव मानकुमरे यांचा थेट इशारा!” 🛑जावळी बँकेतून ‘भोसले-गवळी’ संचालकांवर सडकून टीका; सहकार परिषदेतून ‘सरळ करण्याचा’ घणाघात!(व्हिडीओ)

error: Content is protected !!