
शिखर शिंगणापूरच्या मुंगी घाटात मानाच्या कावडींचा थरार.
.
महाराष्ट्रात यात्रा-जत्रांचा काळ सुरू असून यामध्ये सातारा जिल्ह्यातील लोकदैवत असलेल्या शिखर शिंगणापूर येथील पंधरा दिवस चालणाऱ्या यात्रेला महत्त्व आहे ते येथील अत्यंत खडतड समजल्या जाणारा मुंगी घाट..
ह्या घाटात शंभो महादेवाच्या कावडीचा थरार काही वेगळाच असतो..
अत्यंत अवघड समजला जाणारा हा मुंगी घाट शिव पार्वती हर हर महादेवची गर्जना करत शिवभक्त मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात मानाच्या कावडी सर करत असताना दिसत आहेत.. हे दृश्य आहेत शिखर शिंगणापूरच्या मुंगी घाटातील चैत्र शुद्ध द्वादशीला याठिकाणी महादेवाच्या लग्नाच्या सोहळ्यासाठी हे भाविक कावड घेऊन या ठिकाणी येत असतात.. सासवडच्या तेल्या भुत्याची कावड ही शिखर शिंगणापूरच्या यात्रेसाठी मानाची कावड मानली जाते.