पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त भव्य क्रिकेट चषक 2025 व रक्तदान शिबिराचा आयोजन, समाजसेवेच्या परंपरेला चालना

.पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त भव्य क्रिकेट चषक 2025 व रक्तदान शिबिराचा आयोजन, समाजसेवेच्या परंपरेला चालना

सानपाडा (मुंबई)इम्तियाज मुजावर – ६ एप्रिल २०२५ रोजी सानपाडा सेक्टर ५ येथील गावदेवी मैदानावर पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त आयोजित भव्य क्रिकेट चषक २०२५ व रक्तदान शिबिर अत्यंत मोठ्या प्रमाणावर यशस्वी ठरला. या कार्यक्रमाच्या आयोजनात स्थानिक समाजसेवक, उद्योजक, तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका पार केली.

यावेळी उपस्थित मान्यवरांमध्ये मा. श्रीमंत भुषणसिंहराजे होळकर (वंशज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व इंदौर), मा. श्री. लक्ष्मण व्हटकर साहेब (उपयुक्त, मुंबई महानगरपालिका), सौ. स्नेहाताई सोनकाटे (ओबीसी नेत्या), श्री. बाळकृष्ण गावडे साहेब (उद्योजक), श्री. महादेव अर्जुन, श्री. राजु कोकरे साहेब, श्री. सतिश कोळेकर, श्री. रविशेठ पाटप, श्री. आदित वाघमोडे, श्री. भरत खरात साहेब, श्री. श्रीकांत मल्लाले, श्री. देवाप्पा लावते, श्री. महादेव कोळेकर, श्री. कुमार भाई गोळे, श्री. युवराज येळे, श्री. कोंडिबा शिंदे, श्री. दादासाहेब पडळकर, सौ. संगीता आवकिरकर (सरपंच, मोरबाग) यांच्यासह समाजातील महिला, युवक, उद्योजक, आणि जेष्ठ नागरिक उपस्थित होते.

यावर्षीच्या क्रिकेट चषकात १८ पेक्षा जास्त संघांनी भाग घेतला आणि खेळाडूंनी आपल्या कौशल्याने उत्कृष्ट प्रदर्शन करत उपस्थितांची वाहवाही मिळवली. खेळाच्या माध्यमातून एकतेचा व आरोग्यवर्धक जीवनशैलीचा संदेश दिला गेला. क्रिकेट स्पर्धेच्या साथीत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये १०२ हून अधिक नागरिकांनी रक्तदान केले आणि सामाजिक जबाबदारी निभावली.

रक्तदान शिबिरातून संकलित रक्त “अक्षय रक्तपेढी”द्वारे गरजू रुग्णांना वितरित केले जाणार आहे. प्रत्येक रक्तदात्याला एक वृक्ष देऊन पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला गेला.

कार्यक्रमाच्या अंतर्गत महिलांच्या पथकाने पारंपारिक लेझीम नृत्य सादर करून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त विशेष अभिवादन नृत्य सादर केले.

या उपक्रमाचे यशस्वी आयोजन श्री. सुभाषराव येळे, श्री. नामदेव गोरे, श्री. गणेश थोरात, श्री. संजय शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. आयोजकांनी सहभागी संघांचे आणि रक्तदात्यांचे आभार मानले आणि भविष्यात असेच सामाजिक उपक्रम आयोजित करण्याचा संकल्प केला.

समाजसेवा आणि एकतेचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाने सानपाडा परिसरात एक सकारात्मक बदल घडविला आहे.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

error: Content is protected !!