
श्रीभैरवनाथ यात्रा कुस्ती मैदानात आंबेकर तर्फ मेढा येथील पैलवान ह भ प ज्ञानराज महाराज शेलार यांनी मानाची ढाल पटकावली, मंत्री छत्रपती. शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते सत्कार

श्रीभैरवनाथ यात्रा २०२५ च्या पार्श्वभूमीवर मेढा तालुक्यातील जावळी येथील कुस्ती मैदानात झालेल्या कुस्ती स्पर्धेत पैलवान हभप ज्ञानराज महाराज शेलार यांनी मोठ्या पराक्रमासह मानाची ढाल पटकावली. या स्पर्धेत त्यांनी आपल्या दिगग्ज प्रतिस्पर्ध्यांना हरवून वर्चस्व प्रस्थापित केले.
कुस्ती मैदानावर या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार बनेलेले होते, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. छ. शिवेंद्रराजे भोसले. त्यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून ज्ञानराज महाराज शेलार यांचा विशेष सत्कार केला. त्यांनी ज्ञानराज महाराजांच्या कष्ट आणि कर्तृत्वाची प्रशंसा करत त्यांना शुभेच्छा दिल्या.
“ज्ञानराज महाराज शेलार यांचा संघर्ष आणि परिश्रम यांमुळे त्यांनी हे मोठे यश मिळवले आहे. यासारख्या कर्तृत्ववान व्यक्तींच्या कामगिरीला प्रोत्साहन देणे आवश्यक आहे,” असे श्री. छ. शिवेंद्रराजे भोसले यांनी मानाची ढाल देताना सांगितले.
ज्ञानराज महाराज शेलार यांचे कुस्ती क्षेत्रातील योगदान आणि त्यांचे नेतृत्व कौशल्य यामुळे ते सर्व स्तरांवर आदर्श ठरले आहेत. ह भ प ज्ञानराज महाराज यांनी कीर्तनामध्ये व समाजप्रबोधनात देखील ते महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत अवघ्या छोट्या वयात त्यांनी मिळवलेले हे यश आणि अध्यात्माचे ज्ञान कौतुकास्पद आहे त्यांना यशाची शुभेच्छा देणारे अनेक पैलवान आणि समर्थक या प्रसंगी उपस्थित होते.
या विशेष प्रसंगी ज्ञानराज महाराज शेलार यांनी आपली कृतज्ञता व्यक्त करत, “यात्रा आणि कुस्तीच्या मैदानात मिळालेल्या या यशासाठी मी माझ्या सर्व कुटुंबीयांचे, प्रशिक्षकांचे आणि सर्व सहकार्यांचा आभारी आहे. माझ्या कामगिरीला सन्मान देणाऱ्या सर्वांना मी धन्यवाद देतो,” असे सांगितले.
इम्तियाज मुजावर सातारा.