
शिवश्रुष्टी अवतरली कुडाळ नगरीत: गणेश जयंती निमित्त भव्य नृत्य स्पर्धेत विद्या निकेतनचे शिवराय नृत्य
कुडाळ: 1 फेब्रुवारी 2025

गणेश जयंतीच्या उपलक्ष्यी गजराज मंडळ कुडाळच्या वतीने जिल्हास्तरीय भव्य नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत एक प्रमुख आकर्षण ठरले ते म्हणजे विद्या निकेतन स्कूल आणि जुनिअर कॉलेज, पांचगणी विद्यार्थ्यांनी सादर केलेले अप्रतिम “शिवरायांच्या आदर्शवत जीवनावर आधारित नृत्य”.

या नृत्यात ५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला, ज्यात शिवरायांच्या जन्मापासून ते त्यांच्या राज्यहिषेक सोहळ्यापर्यंत तसेच त्यांच्या विविध पराक्रमांची दृष्यरूपे दर्शवली गेली. नृत्याचे प्रशिक्षण पुण्यातील प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक ‘ये. एम. स्टुडिओ’ मार्फत दोन महिन्यांच्या अथक परिश्रमांनी घेतले गेले. नृत्याच्या वेषभूषेतील उत्कृष्टता आणि नृत्याच्या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली आणि सर्वांनी अप्रतिम दाद दिली.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रतापगड सहकारी कारखान्याचे चेअरमन श्री. सौरभ बाबा शिंदे यांच्या हस्ते विद्या निकेतन स्कूल आणि जुनिअर कॉलेजच्या डायरेक्टर भारती बिरामाणे यांचा सत्कार करण्यात आला. नृत्य सादरीकरणानंतर सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि त्यांचे उत्साहवर्धन केले.
याच नृत्याचे सादरीकरण ‘आय लव्ह पाचगणी’ या महोत्सवातही करण्यात आले होते, जिथे विद्यार्थ्यांनी पारितोषिक मिळवून कार्यक्रमाचे अजून एक शिखर गाठले.