एकनाथ शिंदेंच्या पत्रकार परषदेतील मुद्द्यांचा अर्थ काय?

: एकनाथ शिंदेंच्या पत्रकार परषदेतील मुद्द्यांचा अर्थ काय?

शिंदे पत्रकार परिषदेत म्हणाले, “मला विश्वास होता की, या निवडणुकीत प्रचंड यश मिळेल. आम्ही ज्या योजना केल्या त्याचं प्रतिबिंब या निवडणुकीत पाहायला मिळालं. आतापर्यंतच्या इतिहासात एव्हढ्या मेजॉरिटीने महायुतीला जे यश मिळालं, ते कधीच मिळालं नाही. तुम्ही मुख्यमंत्री व्हावं अशी मागणी केली जात आहे, नेमकं काय ठरलंय? या प्रश्नाचं उत्तर देताना शिंदे म्हणाले, मी जनतेचा मुख्यमंत्री, कॉमन मॅन म्हणून काम केलं. मी म्हणायचो सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर नाही, तर कॉमन मॅन. कॉमन मॅन समजून मी काम केल्यामुळे कॉमन मॅनच्या अडचणी समजून घेऊन सोडवण्याचं काम केलं. त्यामुळे लोकांची भावना असणं साहजिकच आहे. मुख्यमंत्री म्हणून माझ्या नेतृत्वाखाली निवडणुका झाल्या. दोन्ही उपमुख्यमंत्री सोबत होते. सर्व सहकारी सोबत होते. मिळालेलं यश प्रचंड आहे. यामध्ये कुणाचाही संभ्रम नको, म्हणून मागच्या आठवड्यात मी पत्रकार परिषद घेतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाहा आणि भाजपचे अध्यक्ष मुख्यमंत्रिपदाबाबतचा जो निर्णय घेतील, त्याला शिवसेनेचा पूर्णपणे पाठिंबा असेल, असं मी सांगितलं आहे. त्यामुळे किंतू, परंतु कोणाच्याही मनात नसावा. शेवटी मी मनमोकळेपणाने काम करणारा कार्यकर्ता आहे. म्हणून माझा निर्णय मी घेतला आहे”, असंही शिंदे म्हणाले. त्यामुळे एकीकडे शिंदे हे भाजपला पाठिंबा असल्याचंही सांगतायत आणि ते निवडणुका माझ्या नेतृत्वात झाल्याचंही अधोरेखित करुन देत आहेत.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

error: Content is protected !!