प्रमोद पवार सर या “वंडरफुल सुत्रांचालकाचा ” आज वाढदिवस….,

🌹🌹🎂अभिष्टचिंतन🎂🍓🍓
8 नोव्हेंबर
काही माणस स्वभावानं…., काही वागण्यानं….,काही त्यांच्या यशामुळ….,काही त्यांच्या अप्रतिम गुणांमुळे….,काही कर्तृत्वामुळे तर काही माणस त्यांच्या बोलण्याच्या लकबिमुळे माणसांच्या मनात घर करून जातात. असेच एक वंडरफुल व्यक्तिमत्व माझ्या मनावर छाप पाडूनगेलं,शिक्षक,मुख्याध्यापक..,महाराष्ट्र न्युजचे पुर्ववर्ताहर ते आदर्श सूत्रसंचालक….!! असा प्रवास असणारे रुईघर सारख्या छोटे खानी गावातील प्रमोद पवार सर या “वंडरफुल सुत्रांचालकाचा ” आज वाढदिवस….,


प्रमोद सर….,ऐक आनंदी,आल्हाददायी व्यक्तिमत्व मी अगदी जवळून अनुभवलेले नेतृत्व….,लहानपणापासूनच प्रमोद सर चळवळी स्वभावाचे….,मराठी शाळेत शिकून काहीतरी नवीन बनण्याच स्वप्नं उराशी बाळगून होते,पांचगणी या जागतिक दर्जाच्या शैक्षणिक केंद्राची कुस त्यांच्या गावाला लागून असल्याने त्यांची नाळ शैक्षणिक केंद्राशी जुळली, घरची बेताचीच परिस्थिती असल्याने त्यांच्या मनी अनंत ….”लक्ष्मण रेषा ” ….उभ्या होत्या. परंतु मातीशी नाळ न तोडता आपण वेगळ्या क्षेत्रात उत्तुंग भरारी घेण्याचा चंग बांधला….,

सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा आपली स्वप्नं कशी साकार करणार हा प्रश्न होता परंतु शिक्षणाची कास धरत प्रमोदसर ऐक शिक्षक झाले…., शिक्षक म्हणून इंग्रजी माध्यमाच्या शाळेत बस्तान बसवले, पुढे प्रमोद सरांच्या गुणवत्तेची पारख पांचगणी मधील शिक्षणप्रेमी मा.नगराध्यक्ष श्री साहेबराव बिरामने साहेबांना भावली. आणि सरांना सिद्ध होण्याची संधी मिळाली सरांनी ती दवडली नाही…., आणि त्यांनी शालोम मध्ये गरीब व गरजू विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनाची शिदोरी दिली…. 200 गरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण या उपक्रमात सरांनी आपले बहुमोल योगदान दिले . या उपक्रमामुळे गरीब आणि वंचित समाजाशी जवळून संवाद साधता आला…., असे अनेक टप्पे पार करीत ते प्रिन्सिपॉल झाले….!!
हे करीत असताना त्यांनी गरिबीचे चटके सोसणाऱ्या समाजातील मुलांना आपुलकीचं घर मिळावं म्हणून त्यांनी हॉस्टेल काढले आणि त्यातूनही ते सामाजिक सेवेत अग्रेसर राहिले. या प्रवासात त्यांच्या वडिलांच अर्धवट जान त्यांच्या यशस्वी प्रवासाची अधुरी कहाणी म्हणावी लागेल.शिक्षण क्षेत्रातील हा गुरु अफाट बुध्दी चातुर्य आणि स्टेज डेअरिंग मुळे हळू हळू स्टेज मॅनेजर होवू लागला….,आणि यातूनच त्यांची हजरजबाबीपणा,वाचन व्यासंग, संग्रहन ,बहुश्रुतता,भाषाशैली यामुळे त्यांच्यातील ऐक सूत्रसंचालक जन्माला आला….,सूत्रसंचालन हा इव्हेंटचाच महत्त्वपूर्ण भाग आहे. शाळेच्या माध्यमातून कार्यक्रम करता करता आपोआपच त्यांचं या क्षेत्रात करिअर घडू लागलं….,गाव परिसरातील छोटे मोठे कार्यक्रम त्यांना खुणावू लागले आणि ते उत्कृष्ट सूत्रसंचालक म्हणून सर्वत्र परिचित झाले…., 2011मध्ये श्री ना.पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना सरांना सूत्रसंचालक म्हणून संधी मिळाली तिथून त्यांनी मागे वळून पाहिले नाही. त्यानंतर अनेकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाबळेश्वर दौऱ्यावर असताना त्यांनी व्यासपीठ चालत म्हणून कार्य केले.


विशेष म्हणजे कैशिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांसारख्या दिग्गज मंडळीच्या समोर प्रतापगडावर सरांनी सूत्रसंचालन केले व शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी सुद्धा सरांच्या निवेदन कौशल्याचे कौतुक केले ही बाब सरांना ऊर्जा देणारी ठरली.सातारा जिल्ह्यातील मोठी व्यासपीठं सरांना खूनवू लागली या क्षेत्रात सरांनी आपला स्वत:चा वेगळा ठसा उमटवला आहे…., त्यांनी हे वृत्त छंद म्हणून जोपासला आहे….!!


प्रमोद सर तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत कोटी शुभेच्छा…तुमच्या मनातील सारी स्वप्न, इच्छा,आकांक्षा पूर्ण व्हाव्यात यासाठी तुमच्या पुढील आयुष्याच्या वाटचालीसाठी तृप्त भविष्यकाळ लाभो याच शुभेच्छा……!!!!
तुमच्या समृध्दीच्या सागराला किनारा नसावा !
तुमच्या जिवनात आनंदाची फुलं सदैव बहरलेली असावीत आणि,
एकंदरीत तुमचे आयुष्यच एक अनमोल आदर्श बनावे !
ईश्वर आपणास दीर्घायुष्य देवो व आपल्या आयुष्यात आपणास हवे ते मिळो
आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…….!!

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

error: Content is protected !!