जावळी तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेमध्ये मेरी एंजल इंग्लिश मिडियम स्कूल, आखाडे विद्यालयाचे घवघवीत यश

जावळी तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेमध्ये मेरी एंजल इंग्लिश मिडियम स्कूल, आखाडे विद्यालयाचा दणदणीत विजय.
जावळी तालुक्याच्या शासकीय क्रीडा स्पर्धेमध्ये दिनांक 11 ऑक्टोबर 2023 रोजी छत्रपती शाहू महाराज क्रीडा संकुल सातारा येथे पार पडलेल्या स्पर्धेमध्ये 14 वर्षे खालील वयोगट मुले यामध्ये कु.साईराज कापसे याने 100 मीटर धावणे प्रथम क्रमांक, 80 मीटर हर्डल्स द्वितीय क्रमांक व थाळीफेक तृतीय क्रमांक मिळवला तसेच कु. आर्यन शिंदे थाने 80 मी हर्डल्स प्रथम क्रमांक मिळवला.
17 वर्षे खालील वयोगटात मुलांमध्ये
कु.श्रीमय चव्हाण यांने 200 मी धावणे प्रथम क्रमांक , 400 मी प्रथम क्रमांक आणि 400 मी हर्डल्स प्रथम क्रमांक तसेच कु.समर्थ मोहिते यांने 110 मी हर्डल्स मध्ये द्वितीय क्रमांक मिळवला. कु. निहाल शिंदे यांने 400 मी हर्डल्स मध्ये द्वितीय क्रमांक मिळवला तसेच 3 कि.मी धावणे मध्ये कु.आर्यन कांबळे याने तृतीय क्रमांक मिळविला व हॅमर थ्रो मध्ये कु.क्षत्रिय शिंदे यांने द्वितीय क्रमांक मिळवला. कु.आर्यन धोत्रे याने तृतीय क्रमांक मिळवला तसेच 3किमीट चालणे मध्ये कु.साहिल खरात यांने तृतीय क्रमांक मिळवला तसेच 17 वर्षाखालील मुलींच्या गटामध्ये कु. ईश्वरी निकम हिने 100 मी, 200 मीआणि
400 मी धावणे स्पर्धेमध्ये तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला तसेच
1500 मी धावणे मध्ये कु.नेहा पवार हिने द्वितीय क्रमांक मिळविला आणि भालाफेक व हॅमर थ्रो स्पर्धामध्ये कु. त्रिशा निकम हिने प्रथम क्रमांक आणि द्वितीय क्रमांक मिळविला तसेच कु.सानवी शिंदे हिने भालाफेक मध्ये द्वितीय क्रमांक मिळवला.कु. आदिती रोकडे हीने हॅमर थ्रो मध्ये प्रथम क्रमांक मिळवला.
3 कि.मी धावणे मध्ये कु.आर्या शिंदे हिने द्वितीय क्रमांक मिळवला. बांबू उडी प्रकारात कु. नेहा गायकवाड़ हिने प्रथम क्रमांक व 3 कि.मी चालणे प्रकारात कु.पायल शेळके हिने प्रथम क्रमांक व कु.नेहा पवार हिने द्वितीय क्रमांक तसेच 14 वर्षाखालील 4×100 मी. रिले स्पर्धेमध्ये तालुकास्तरीय प्रथम क्रमांक मिळवला या टिममध्ये साईराज कापसे, युवराज कापसे, हर्षल पोफळे, आर्यन शिंदे, रुद्र निंबाळकर यांनी चांगली कामगिरी केली.


वरील सर्व यशस्वी खेळाडूंची जिल्हास्तरीय निवड झाल्याबद्दल सातारा जिल्ह्याचे
क्रीडा अधिकारी मा.श्री. नितीन तारळकर साहेब व शाळेच्या संस्थापिका क्रांती पवार मॅडम, करण पवार सर, केशव पवार सर, विशाल पवार सर, सौरभ खानोलकर सर्व, मुख्याध्यापक रुपेश रोकडे सर,उमेश सर,स्मिताराणी घाटे मॅडम, क्रीडा शिक्षक अनिकेत बोबडे सर तसेच सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्वांचे कौतुकास्पद अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या💐💐💐😊

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

error: Content is protected !!