कुडाळचा बहुमान… जावळीचा अभिमान!संदेश कांबळेची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी थेट निवड

सातारा :कुडाळ (ता. जावळी) येथील सुपुत्र संदेश उमेश कांबळे याने सातारा जिल्हा ज्युनिअर मैदानी स्पर्धेत फास्टरलाईफ ॲथलेटिक्स क्लब तर्फे १६ वर्षाखालील वयोगटात ६०० मीटर धावण्याच्या प्रकारात चमकदार कामगिरी करत द्वितीय क्रमांक पटकावला. या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर त्याची पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी थेट निवड झाली असून, जावळी तालुक्यासाठी ही अभिमानाची बाब ठरली आहे. गावात धावपटूंसाठी […]
श्रावणी सोमवारनिमित्त हुमगावच्या श्री मेरुलिंग देवस्थानात भक्तीचा सागरसंदीप परामणे यांची बळीराजाच्या सुख-समृद्धीसाठी भावपूर्ण प्रार्थना

हुमगाव (ता. जावळी) :श्रावण मासातील पवित्र सोमवार… सकाळी पहाटेपासूनच श्री मेरुलिंग मंदिर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता. पुरातन आणि श्रद्धास्थान असलेल्या या मंदिरात आज धार्मिक विधी, मंत्रोच्चार आणि घंटानादात वातावरण भारावून गेले. याच पार्श्वभूमीवर जावळी भाजपचे तालुकाध्यक्ष मा. संदीप परामणे यांनी पत्नीसमवेत उपस्थित राहून विधीवत रुद्राभिषेक केला. पाण्याचा कलश, बेलपान, दुग्ध, धान्य आणि पंचामृताचा अभिषेक […]