
*सन २०२४ सालच्या ९ व्या आंतरराष्ट्रीय योग स्पर्धेत सौ सुजाता विकास पाटील-शिरगांवकर यांना योगासन मध्ये सुवर्ण व रौप्य पदक विजेत्या **
सन २०२४ सालच्या बॅंकॅाक येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय योग स्पर्धेत सौ सुजाता विकाल पाटील यांची भारता देशा तर्फे निवड झाली. दि.३०/३/२०२४ रोजी थायलँड या देशामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील योग स्पर्धा संपन्न झाल्या. सदर स्पर्धेत अनेक देश सहभागी झाले होते.ट्रेडीशनल योगा व रिरमीक योगा या स्पर्धेत सौ सुजाता पाटील यांनी भारत देशाचे प्रतिनिधीत्व केले व १५ अत्त्यंत अवघड योगासन करून देशासाठी सुवर्ण पदक व रौप्य पदक मिळविले आहे.
नेपाळ देशामध्ये पार पडलेल्या स्पर्धेत त्यांनी यापुर्वी रौप्य पदक मिळविले आहै.
कऱ्हाड तालुक्यातील, शिरगांव या गावचे जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक कै. श्री गजानन बंडोजी पाटील व कै श्री शामराव बंडोजी पाटील यांचा वारसा लाभलेले पाटील- शिरगांवकर कुटुंब हे शेतकरी व सुशिक्षित कुटुंब .
कै हिंदुराव पाटील (आण्णा) व कै. श्री बी. जी. पाटील (बापू ) हे पोलीस दलामध्ये नावाजलेले पोलीस अधिकारी व त्यांनी सातारा सांगली कोल्हापूर या भागातील सुमारे २५० शेतकरी कुटुंबातील मुलांना ठाणे पोलीस दलात व कंपनी मध्ये भरती करून नोकरीस लावलेले आहे .
उच्च शैक्षणिक व साधे राहणे समाज व समाजिक बांधिलकी यातून अनेक कम हे कुटुंब करत आहे. ॲड विकास पाटील शिरगांवकर यांच्या त्या स्नुषा असून त्यांना दोन मुले शिवराज ,धनराज, त्यांच्या भगिनी सौ प्रिया पाटील व सौ वैशाली जमदाडे तसेच योग विद्याधाम सातारा यांचे मुख्य सौ शैलजा ठोके मॅडम सौ श्वेता कोल्हापुरे मॅडम व संस्थेचे सर्व पदाधिकारी त्यांना योगाच्चा कामा मदत करत असताात,
सौ सुजाता पाटील यांना योगाचे महत्व योग विद्याधाम नाशिक येथील श्री मंडलीक सर, सौ मंडलीक मॅडम, यांनी पटवून दिले असून हे यश या सर्वाचे यश आहै असे सौ सुजाता पाटील मॅडम यांनी बोलुन दाखविले
सातारा जिल्ह्यांचे नाव आंतराष्ट्रीय स्तरावर शिरगांवकर कुटुंब वारंवार झळकवित आहे. सर्व सातारकर व विशेषत: योग साधक त्यांचे कौतुक करत आहेत
दै. ऐक्य परिवारतर्फे सौ.सुजाता पाटील- शिरगांवकर मॅडम यांचे मन:पुर्वक अभिनंदन व शुभेच्छा