३६ वर्षांची अखंड परंपरा – रक्तदानातून माणुसकीचा सन्मानकै. विनोद (भैय्या) सकुंडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ रक्तदान शिबिर


३६ वर्षांची अखंड परंपरा – रक्तदानातून माणुसकीचा सन्मान
कै. विनोद (भैय्या) सकुंडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ रक्तदान शिबिर

वाई (प्रतिनिधी) –इम्तियाज मुजावर
महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे औचित्य साधून, नवप्रकाश मंडळ भगवा कट्टा प्रतिष्ठान, वाई व माऊली ब्लड सेंटर, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार, दिनांक १ मे २०२५ रोजी सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत थत्ते बंधु स्मृती मंदिर, भगवा कट्टा, मधली आळी, वाई येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या उपक्रमाची यंदाची विशेषता म्हणजे ३६ वर्षांची अखंड परंपरा आणि कै. विनोद (भैय्या) सकुंडे यांना समर्पित स्मृतिप्रीत्यर्थ रक्तदान. ‘रक्तदान हेच जीवनदान’ या विचारसरणीला अनुसरून, समाजातील प्रत्येक घटकाला रक्तदानासाठी पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या शिबिराचे आयोजन माउली चॅरिटेबल ट्रस्ट संचलित माउली ब्लड सेंटर यांच्या तांत्रिक सहकार्याने करण्यात आले आहे. वर्षानुवर्षे सुरू असलेल्या या उपक्रमामुळे वाई परिसरात समाजप्रबोधन, माणुसकीचा सन्मान आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून एक सकारात्मक वातावरण तयार झाले आहे.

कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या नवप्रकाश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सर्व नागरिकांना या पुण्य उपक्रमात सहभाग घेण्याचे आवाहन केले असून, गरजूंना रक्ताची गरज भासल्यावर हे रक्तदान नवजीवन देणारे ठरणार आहे, असा विश्वास व्यक्त केला आहे.


aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

error: Content is protected !!