हजारोंच्या संख्येने जोडी रन संपन्न. जावळीकरांमध्ये मोठा उत्साह

हजारोंच्या संख्येने जोडी रन संपन्न
. जावली तालुक्यात मोठा उत्साह

  • जगातील एकमेव जोडी रन* दिनांक 6 ऑक्टोबर 20 24 रोजी संपन्न झाली .
    Top Gear जावली जोडी रन 2024 वर्ष 5 वे या 10 किलो मीटर अंतराच्या रन साठी टायटल स्पॉन्सर हे Top Gear व रनिंग पार्टनर Nature plateau Paradise Kas आणि इव्हेंट पार्टनर आहेत यशवंत हॉस्पिटल , मिनाक्षी हॉस्पिटल . मंगलमूर्ती हॉस्पिटल, दिवेकर हॉस्पिटल, ऐतिहासिक अन निसर्गसंपन्न जावलीचे खोरे अन जोडीला वेळणामायच्या तीरावरून जाणारा धाव मार्ग . मेढा मोहाट पिंपरी गांजे कुसुंबी ते पुन्हा मेढा असा 10 किलोमीटरचा रूट . रूटवर ठिकठिकाणी पाणी , बिस्किट , ORS व फळे यांचे स्टॉल्स लावून धावकांना सेवा देणारे स्वयंसेवक खूप मोठ्या प्रमाणामध्ये होते . गावागावत तरुण मंडळे धावकांना चिअर अप करण्यासाठी जागे राहून रनर्सचा उत्साह वाढवला . धावक 1 मीटरचा बेल्ट लावून जोडीने धावत असताना वेगळाचा अनुभव घेत रन पूर्ण केली . मौज मजा मस्ती अन आरोग्यासाठी जोडीने अन कुटुंबासह हजारो धावक सहभागी झाले .
    जावली तालुक्यातील सर्वसामान्य जनता व तरुणांना जोडी रनच्या माध्यमातून आरोग्याबाबत जागरूकता , व्यायाम , लवकर उठून दिवस मोठा करणे अशा बाबतीत सकारात्मकता निर्माण करणे हे या रन चे ध्येय होते . त्या बाबत जावलीच्या स्थानिकांकडून ही वाढता प्रतिसाद मिळत आहे . अनेक तरुण तरुणी , तरुण मंडळे , बचत गटाच्या महिला मोठ्या संखेने सहभागी होत आहेत ही कौतुकाची बाब आहे . आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय, वेण्णा हायस्कूल यांच्या सर्व मुलांनी सहकार्य केले
    दिनांक 6 ऑक्टोबर रोजी सकाळी 5.30 ते 5 .55 झुम्बा डान्स , वॉर्म अप होईल त्यानंतर
    6 वाजता मान्यवरांच्या हस्ते फ्लॅग ऑफ – करण्यासाठी टॉप गिअरचे मालक श्रीकांत पवार, श्रद्धा पवार, श्री छाबडा साहेब,माजी आमदार सदाभाऊ सपकाळ, नायब तहसीलदार संजय बैलकर, संस्थापक नवनाथ डिगे व RSAJ मान्यवर उपस्थित होते, फ्लॅग दाखवून रनला सुरुवात झाली

  • त्यानंतर 15 मिनिटांनी fun run सुर होईला . धावकांना सुविधा व्हावी प्रेरणा मिळावी म्हणून बॅण्डपथक तसेच चिअरअप करणारे तरुण ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात होते . दोन ठिकाणीअडचणीच्या प्रसंगी तत्काळ ॲम्ब्युलन्स आणि डॉक्टरांचे पथक तैनात करण्यात आले होते. स्पर्धा संपताना प्रत्येक स्पर्धकाचे टाईमिंग चिप ट्वारे टाईमिंग रिकॉर्ड होईल शिवाय मॅन्युअली ही नंबर काढले जातील .
    त्यानंतर झुम्बा डान्स व धावकांनी स्वतः बसवलेले ग्रुप डान्स खूप डान्स करून मज्जा मजा केली . जशी Top Gear जावली जोडी रन ही जगा मधली एकमेव रन आहे तशीच तब्बल नव्वद बक्षीसे देणारी ही एकमेव जोडी रन ठरलेआहे,मेढा पोलिस स्टेशन या वर्षीही उत्तम सहकार्य करणार आहे .
    जावली तालुका तहसिलदार मा कोळेकर साहेब , गटविकास अधिकारी मा भोसले साहेब मेढा पोलिस प्रमुख API श्री ताटे साहेब , मेढा नगरपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी व नगराध्यक्ष आणि सर्व सरकारी कार्यालयातील कर्मचारी यांचे सहकार्य मिळाले आहे .
    जागतिक स्तरावर जावळीची ओळख निर्माण करणाऱ्या Top Gear जावली जोडी रन साठी तमाम जावलीकर सज्ज झाले आहेत . नवरात्रीच्या उत्सवातच हा योग येत आहे तेव्हा मोठ्या संखेने सहभागी होण्याचे आवाहन Top Gear जावली जोडी रन चे आयोजक व संस्थापक श्री नवनाथ डिगे,सचिव संजय धनावडे, सुहास पाटील, मिलिंद हळवे, सुधीर पवार, व इतर सहकारी यांनी केले आहे .टिम RSAJ & जावली जोडी रन
    धावकांचा खूप खूप सहकार्य मिळाले पुढच्या वर्षी मोठ्या प्रमाणात येऊ अशी ग्वाही दिली असोसिएशनच्या माध्यमातून सर्व धावकांचे, पत्रकारांचे सहकाऱ्यांचे अभिनंदन केले,
  • मान्यवरांच्या हस्ते 90 ट्रॉफी देऊन सन्मानित केले
aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

error: Content is protected !!