
सातारा प्रतिनिधी इम्तियाज मुजावर
सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण आहे… कारण गेल्या दोन वर्षांपासून न मिळालेलं ठिबक सिंचनाचं अनुदान आणि आता स्ट्रॉबेरी क्षेत्रात होणाऱ्या सरकारी घोषणा, यामध्येही स्पष्टतेचा अभाव आहे…
📍शेतकऱ्यांकडून समजते की स्ट्रॉबेरी उत्पादकांना प्रति एकर ३२ हजार रुपये अनुदान देण्याचं कृषी विभागाचं आश्वासन होतं. मात्र याबाबत कोणतीही स्पष्टता नाही.
📍या योजनेबाबत संबंधित कृषी अधिकाऱ्यांनी स्पष्ट उत्तरं द्यावीत आणि नेमकी योजना प्रत्यक्षात कधी राबवली जाणार हे सांगावं, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होऊ लागली आहे. सध्या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरू आहे मात्र शेतकऱ्यांच्या संदर्भात अद्यापही मंत्रिमंडळात कोणतेही निर्णय जाहीर झाले नसल्याने शेतकरी वर्गांमध्ये संताप व्यक्त केला जातोय संपूर्ण महाराष्ट्रात विशेष करून सातारा जिल्ह्यात 80 टक्के पेरण्या रखडले आहेत ओला दुष्काळ जाहीर करण्याचे मागणी देखील होत आहे तरी देखील या प्रश्नावर कोणीही गांभीर्याने घेत नसल्याने शेतकरी वर्गाकडून नाराजी व्यक्त केली जात आहे
याचबरोबर…
ठिबक सिंचनाच्या प्रकरणावरूनही शेतकरी त्रस्त आहेत:
➡️ गेल्या दोन वर्षांपासून जावळी तालुक्यात अनेक शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनासाठी अर्ज केले.
➡️ त्यासाठी हजारो रुपये खर्च करून संबंधित कृषी दुकानांतून व ‘कृषी महा सेवा’ पोर्टलवरूनही शेतकऱ्यांनी ड्रिप सिस्टिम बसवली.
➡️ मात्र आजपर्यंत एकाही शेतकऱ्याला ठिबक सिंचनासाठीचे अनुदान मिळालेले नाही!

शेतकरी म्हणतात –
“अनुदान मिळणार या खात्रीने आम्ही खर्च केला. आता दोन वर्ष झाली, पैसे गेले, अनुदान नाही. सरकार आणि कृषी विभाग फक्त घोषणा करतोय, प्रत्यक्षात जमीनदार शेतकऱ्यांचे हाल सुरूच आहेत.“
या ठिबक योजनेसाठी राज्य सरकारकडून कोट्यवधींचं बजेट जाहीर केलं गेलं, मात्र प्रत्यक्षात तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत हे पैसे पोहोचलेलेच नाहीत.
➡️ लाखो रुपयांचा चुराडा
➡️ योजनांचे नाव, जाहिराती मात्र मोठमोठ्या
➡️ पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या हातात काहीच नाही!
🌾 कृषी विभागाने जावळी तालुक्यातील या दोन्ही गंभीर प्रकरणांची तत्काळ दखल घ्यावी.
शेतकऱ्यांचे पैसे अडकवणे ही केवळ आर्थिक नव्हे तर नैतिक फसवणूकही आहे. 🌾