सौरभ शिंदे यांचे नेतृत्व : सभासदांचा एकमुखी विश्वास


कै. लालसिंगराव शिंदे नागरी सहकारी पतसंस्थेची ३७ वी वार्षिक सभा उत्साहात — सौरभ शिंदे यांच्या नेतृत्वामुळे संस्थेला नवा आयाम

कुडाळ (ता. जावली) : कै. लालसिंगराव शिंदे नागरी सहकारी पतसंस्थेची ३७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा स्वामी मंगल कार्यालय, कुडाळ येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या सभेत संस्थेच्या आर्थिक प्रगतीसह भविष्यातील योजना सभासदांसमोर मांडण्यात आल्या.

सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा सौ. अंकिता सौरभ शिंदे होत्या. प्रारंभी दिवंगत सभासदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. स्वागत संचालक जितेंद्र खरात यांनी केले. आर्थिक अहवाल सौ. अंकिता शिंदे यांनी सादर केला, तर व्यवस्थापक प्रकाश शिवणकर यांनी नोटीस व वार्षिक पत्रकांचे वाचन केले. संचालक रवींद्र निकम (सर) यांनी सभासदांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

यावेळी मार्गदर्शक संचालक सौरभ शिंदे यांनी संस्थेच्या कामकाजाचा वर्धिष्णू आलेख सादर केला. संस्थेच्या व्यवसायात झालेली वाढ, आर्थिक स्थैर्य, सभासदांचा वाढता सहभाग आणि नव्या संधींबाबत त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. “सभासदांच्या विश्वासामुळेच आज संस्था मजबूत पायावर उभी आहे. आगामी काळात अधिक पारदर्शकता, नवनवीन सुविधा व सर्वसमावेशक धोरणांमुळे पतसंस्था आणखी उंचीवर नेण्याचा आमचा संकल्प आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले. त्यांच्या दूरदृष्टी आणि ठोस नेतृत्वामुळे संस्थेच्या भविष्यातील वाटचालीबद्दल सभासदांमध्ये नवा आत्मविश्वास निर्माण झाला.

सभेत उत्तम पवार, धनंजय केंजळे, प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे संचालक शांताराम पवार व वसंतराव तरडे यांनी सहभाग घेत आपल्या भावना व्यक्त केल्या.

शेवटी उपाध्यक्ष रघुनाथ तरडे यांनी आभार मानून सभा यशस्वीरित्या संपन्न झाल्याची नोंद केली.

३७ वी वार्षिक सभा संस्थेच्या आर्थिक बळकटीची साक्ष ठरली असून, सभासदांचा एकमुखी विश्वास असा आहे की सौरभ शिंदे यांच्या नेतृत्वामुळे पतसंस्थेला सहकार क्षेत्रात आणखीन उंची गाठता येईल.


aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

error: Content is protected !!