सौरभ शिंदे यांची“रणनिती, संघटन आणि निर्णायक नेतृत्व; कुडाळ गटाने शिवेंद्रराजेंच्या विचारला दिला कौल”

कुडाळ | कुडाळ जिल्हा परिषद गटात जोरका झटका कसा दिला जोरसे……

राजकीय घडामोडी च्या पाठीमागील इन साईड स्टोरी

शिवेंद्रसिंहराजेंच्या नेतृत्वाखाली सौरभ शिंदे गटाची झेप;
पंधरा वर्षांचा प्रभाव कोसळला, नवे सत्ताकेंद्र नवा राजकीय पाया
कुडाळ | (विशेष राजकीय विश्लेषण)
कुडाळ जिल्हा परिषद गटाचा निकाल हा केवळ निवडणूक निकाल नाही—तो तालुक्याच्या राजकारणातील सत्ताबदलाचा ऐतिहासिक टर्निंग पॉईंट आहे. गेली पंधरा वर्षे स्थिर मानली गेलेली राजकीय रचना एका झटक्यात कोसळली आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सौरभ शिंदे गटाने आपली निर्णायक छाप उमटवली.
हा विजय अचानक घडलेला नाही; तो आखलेल्या, मोजून मापून राबवलेल्या आणि शेवटच्या टप्प्यापर्यंत अंमलात आणलेल्या रणनीतीचा परिणाम आहे.


****(कुडाळ गण : ):….‘एकहाती सत्ता’ची प्रत्यक्ष चाचणी
कुडाळ गणामध्ये या निवडणुकीपूर्वीच स्पष्ट संकेत होते—हा गण कधीच प्रत्यक्ष अडचणीत नव्हता; फक्त तसा प्रोजेक्ट केला जात होता. जमिनीवर मात्र परिस्थिती वेगळी होती.
अजिंक्यतारा–प्रतापगड सहकारी साखर कारखान्याची वाढलेली ताकद, स्थानिक संघटनांची जुळवाजुळव आणि गावोगावी असलेली मजबूत रचना या सर्वांचा थेट फायदा भाजपला झाला.
विशेषतः कुडाळ गावात सर्वाधिक गट एकत्र आणण्यात आले. अंतर्गत मतभेद बाजूला ठेवत एकसंघ लढा उभा करण्यात सौरभ शिंदे गट यशस्वी ठरला. त्याचा परिणाम म्हणजे कुडाळ गावातून तब्बल ११०० मतांची आघाडी—जी निकालाचा निर्णायक टप्पा ठरली.
ही आघाडी केवळ आकड्यांची नव्हती; ती “बाबाराजेंच्या विकासाला कुडाळकरांची भक्कम साथ” असल्याची राजकीय पावती होती.
राष्ट्रवादीचे तुतारी चिन्हावर शरद पवार पक्षाकडून उभे राहिलेले उमेदवार राजेंद्र शिंदे यांची उमेदवारी का सपशेल फेल ठरली?
या निवडणुकीत राजेंद्र शिंदे यांची उमेदवारी अपेक्षेप्रमाणे उंचावली नाही. पारंपरिक प्रभावावर विसंबून राहणे, नव्या पिढीतील मतदारांशी कमी संवाद आणि संघटनात्मक चैतन्याचा अभाव—या कारणांमुळे त्यांची रणनीती कमकुवत ठरली. राजेंद्र शिंदे यांच्या बाजूने राष्ट्रवादीचा कुठलाही मोठा नेता स्थानिक पातळीवर उतरलाच नाही याची कारणे तपासली तर खूप वेगळी निघत आहेत. जनता म्हणते हे अंदर की बात है! त्या निमित्ताने सौरभ शिंदे यांचा धबधब
विरोधी पक्षातील वरिष्ठ नेत्यांवर देखील आहे हे मात्र यानिमित्ताने स्पष्ट झाले. याउलट सौरभ शिंदे गटाने
युवा कार्यकर्त्यांना सक्रिय केले
बूथनिहाय जबाबदाऱ्या वाटल्या
प्रत्येक गावात स्थानिक समन्वयक उभे केले
यामुळे प्रचार फक्त घोषणांपुरता मर्यादित राहिला नाही, तर मतांमध्ये रूपांतरित झाला.


सायगाव गण : भावनिक नाळ व संघटनात्मक ताकद
सायगाव गणात चित्र आणखी वेगळं होतं. येथे शिवेंद्रराजे आणि सौरभ शिंदे यांच्या माध्यमातून सहकाराला नवीन चालना देण्यासाठी आणि जावळी तालुक्यातला ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अजिंक्यतारा–प्रतापगड कारखान्यामुळे तयार झालेला मजबूत सामाजिक गट सक्रिय होता. त्यासोबतच महाराज साहेबांवर प्रेम करणारा एक मोठा वर्ग होता, ज्याने पक्षाने घेतलेले सर्व निर्णय शरसंधान मानून प्रामाणिकपणे काम केलं.
हा भावनिक आणि संघटनात्मक संगमच निर्णायक ठरला.
दादा पाटील यांच्या एकेकाळी पंचायत समितीत झालेल्या पराभवाची परतफेड या निकालाने झाली, अशी स्थानिक पातळीवर चर्चा आहे.
आनेवाडीला प्रतिनिधित्व मिळाल्याने त्या भागात समाधानाचं वातावरण आहे.
महाराज साहेबांचे शिलेदार, तसेच काका-भैय्या मानणारा वर्ग सायगाव गणात स्पष्टपणे एकवटला.


कुडाळ जि.प. गटात गिरी दांपत्याचे अभूतपूर्व यश
या निवडणुकीतील एक महत्त्वाचा घटक म्हणजे गिरी दांपत्याचे समन्वय आणि मनोमिलन. तिकीट वाटपानंतर पहिल्याच दिवसापासून दादा-बाबा यांच्यात झालेलं मनोमिलन ही निवडणुकीची मध्यवर्ती घटना ठरली.
सुरळीत प्रचार, सुसूत्रता, एकत्रित आखलेली रणनिती आणि एकमेकांच्या विचाराने घेतलेले निर्णय—यामुळे कार्यकर्त्यांमध्ये स्पष्ट संदेश गेला की या वेळी अंतर्गत संघर्ष नाही, तर एकच लक्ष्य आहे—विजय.
महाराज साहेबांसाठी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते हेवे-दावे बाजूला ठेवून एकदिलाने लढले, ही या विजयाची सर्वात मोठी जमेची बाजू ठरली.


सुहास गिरींना मानणारा स्वतंत्र वर्गही सक्रिय झाला. या वर्गाने केवळ पाठिंबा दिला नाही, तर मतदानाच्या दिवशी पूर्ण क्षमतेने काम केलं—त्याचा थेट फायदा मतांच्या आकड्यात दिसून आला.
सौरभ शिंदे गटाची निर्णायक झेप
या संपूर्ण समीकरणात सर्वाधिक लाभ सौरभ शिंदे आणि त्यांच्या गटाला झाला आहे.
कारखान्याच्या वाढत्या प्रभावाला संघटनात्मक बळ जोडत त्यांनी स्वतःची स्वतंत्र राजकीय ओळख मजबूत केली.
तरुण नेतृत्वाची प्रतिमा
निर्णयक्षम भूमिका
आक्रमक पण नियंत्रित प्रचार
स्थानिक पातळीवरील मजबूत नेटवर्क
या चार स्तंभांवर त्यांनी आपला विजय उभा केला.
आज कुडाळ तालुक्यात स्पष्टपणे दिसून येतंय—सौरभ शिंदे गट हे उद्याचे सत्ताकेंद्र म्हणून आकार घेत आहेत.


शिवेंद्रसिंहराजेंची अंतिम मोहोर
या सगळ्या रणनितीला अंतिम धार दिली ती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाने.
त्यांनी संपूर्ण निवडणूक एका स्पष्ट संदेशावर केंद्रित ठेवली—
“विकास, संघटन आणि निर्णायक नेतृत्व.”
त्यांच्या हस्तक्षेपामुळे अंतर्गत मतभेद शांत झाले, गटबाजी आटोक्यात आली आणि संपूर्ण लढत एकाच दिशेने वळली.
निष्कर्ष : सत्ता बदल नव्हे, सत्ताकेंद्र बदल
कुडाळ जि.प. गटाचा निकाल हा केवळ विजय नाही; तो सत्ताकेंद्र बदलाचा स्पष्ट संकेत आहे.
पंधरा वर्षांचा प्रभाव एका झटक्यात संपला आणि नव्या नेतृत्वाची पायाभरणी झाली.


आजच्या घडीला कुडाळच्या राजकारणात तीन गोष्टी निर्विवाद आहेत—
शिवेंद्रसिंहराजेंचे वाढते वर्चस्व
सौरभ शिंदे गटाची संघटनात्मक ताकद
एकदिलाने लढलेल्या टीमवर्कचा प्रभाव
कुडाळने कौल दिला आहे—
जुने समीकरण नव्हे, तर नवे नेतृत्व आणि निर्णायक कृती.
आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे की, या विजयाचं रूपांतर विकासाच्या ठोस कामांमध्ये कितपत आणि किती वेगाने होतं. मात्र सध्यातरी स्पष्ट आहे—
कुडाळच्या राजकारणात नवं सत्ताकेंद्र आकाराला आलं आहे, आणि त्याच्या केंद्रस्थानी सौरभ शिंदे गट ठामपणे उभा आहे.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

error: Content is protected !!